नीता अंबानी यांची न्यूयॉर्कच्या 'मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट'च्या विश्वस्तपदी निवड

नीता अंबानी यांची न्यूयॉर्कच्या 'मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट'च्या विश्वस्तपदी निवड

भारतीय कला आणि संस्कृतीच्या संवर्धन आणि प्रसारासाठी नीता अंबानी यांनी मोठं योगदान केलंय. त्यांच्या या भरीव कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात आलीय.

  • Share this:

न्यूयॉर्क 13 नोव्हेंबर : सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी (Nita Ambani ) यांची न्यूयॉर्कच्या(New York) प्रतिष्ठेच्या 'मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट'च्या( Metropolitan Museum of Art) विश्वस्तपदी निवड झालीय. अशी निवड होणाऱ्या नीता अंबानी या पहिल्याच भारतीय आहेत. म्युझियमचे संचालक डॅनियल बोर्डस्की यांनी मंगळवारी ही घोषणा केली. यशस्वी उद्योजिका असेलेल्या नीता अंबानी यांनी सांस्कृती आणि कला क्षेत्रात दिलेल्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची  निवड करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

भारतीय कला आणि संस्कृतीच्या संवर्धन आणि प्रसारासाठी नीता अंबानी यांनी मोठं योगदान केलंय. त्यांच्या या भरीव कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे असे गौरव उद्गारही बोर्डस्की यांनी काढले आहेत. नीता अंबानी यांनी म्युझियमला कायम मदत केलीय. म्युझियमच्या विकासातही त्यांचं योगदान आहे. त्यामुळे म्युझियमच्या संचालक मंडळावर त्यांचं स्वागत करताना मला आनंद होतोय असंही बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.

ही निवड झाल्यानंतर नीता अंबानी म्हणाल्या, ही निवड म्हणजे मी माझा गौरव समजते. गेली अनेक वर्ष या म्युझियमच्या विकास कार्यात माझा सहभाग आहे. म्युझियमच्या वतीने भारतातची अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहे. भारतीय कला आणि संस्कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर जावी, त्याची चर्चा व्हावी, जगभर दखल घेतली जावी अशी माझी इच्छा आहे. आज या क्षेत्रात मोठं काम होतंय. ते सामाजिक काम आणखी भव्य आणि व्यापक करण्याची माझी इच्छा आहे.

रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने भारतात कला, संगीत आणि संस्कृतीविषयक अनेक उत्सव आणि महोत्सवांचं आयोजन गेली अनेक वर्ष केलं जातंय. या उपक्रमामुळे अनेक नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळालं तर भारतीय कला आणि संस्कृतीची ओळख जगभर पोहोचण्यात मदत झाली.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 13, 2019, 2:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading