फ्रान्सचा एंडर झाला जयेंद्र तर रेक्यो बनली राजेश्वरी, करणार जगभर हिंदू धर्म प्रसार

कुंभमेळ्यात परदेशी साधू बनले महामंडलेश्वर, जगभरात करणार हिंदू धर्माचा प्रसार

  • Share this:

प्रयागराज येथे कुंभमेळ्यात भारतातील साधूंसोबत परदेशातील काही साधूंनी पट्टाभिषेक सोहळ्यात भाग घेतला होता. यात १३ आखाड्यातील साधूंच्या या सोहळ्यात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील सहभागी झाले होते.

निर्माोही आखाड्याने शुक्रवारी ज्या परदेशी संतांना पट्टाभिषेक केला. त्यामध्ये तीन महिलांचा देखील समावेश आहे. या सोहळ्यासाठी अनेक परदेशी नागरिक उपस्थित होते.

परदेशातील संताना आखाडा प्रमुख आणि महामंडलेश्वरांनी दीक्षा दिली. त्यानंतर प्रथेनुसार चादरपोशी कार्यक्रम झाला.

भारतीय साधुंप्रमाणे वैराग्य स्वीकारुन परदेशी नागरिक महामंडलेश्वर बनले.

13 आखाड्याच्या पदाधिकाऱ्यांसह, प्रमुख आणि महंतांनी या नव्या महामंडलेश्वरांमा माळा घालून दीक्षा दिली.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं साधूंनी माळा घालून परंपेरनुसार स्वागत केलं.

निर्मोही आखाड्याच्या साधूंनी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना स्मृतीचिन्ह भेट म्हणून दिलं.

ज्या परदेशी संतांनी दीक्षा घेतली त्यामध्ये फ्रान्सच्या एंडर मॉनोसमी उर्फ जयेंद्र दास, यूएसएच्या जोनाथन मिशेल उर्फ जीवननंदा दास,इस्त्रायलच्या के डारन शेनॉन उर्फ ध्यानानंदा दास, अमेरिकेच्या टेलर सॅमुअल फ्रीडमैन उर्फ त्यागानंदा दास, अॅरिजोनाच्या पीटर उर्फ स्वामी परमेश्वरानंद आणि अॅलेक्झेंडर जॉन उर्फ अनंतानंद दास यांना महामंडलेश्वर करण्यात आलं आहे.

पट्टाभिषेकाच्या सोहळ्याला आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी उपस्थित होते.

यात 3 परदेशी महिलांमध्ये जपानच्या रेक्यो उर्फ राजेश्वरी देवी आणि दक्षिण अमेरिकेच्या जेमी एलिन उर्फ श्रीदेवी दासी आणि युएसएच्या लीला मारिया उर्फ ललिता श्रीदासी यांना महामंडलेश्व करण्यात आलं आहे.

आखाद्यातील एका साधुने सांगितले की, हरिद्वार येथे होणाऱ्या पुढच्या कुंभमेळ्यात 40 परदेशी संतांना महामंडलेश्वर करण्यात येणार आहे. तसेच महामंडलेश्वर झालेल्या साधुंनी हिंदू धर्माचा प्रसार करण्याची शपथ घेतली आहे.

महामंडलेश्वर झालेल्यांनी गुरूची सेवा करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा लागतो. तसेच ही पदवी मिळाल्यानंतर या पदाचा दुरुपयोग करता येत नाही. त्याचबरोबर धर्माचा प्रसार करावा लागतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2019 09:52 AM IST

ताज्या बातम्या