...अन् निर्मला सीतारमन यांनी व्यासपीठावरच शहीद जवानाच्या आईचे पाय पडून घेतले आशीर्वाद

...अन् निर्मला सीतारमन यांनी व्यासपीठावरच शहीद जवानाच्या आईचे पाय पडून घेतले आशीर्वाद

संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी शहीद जवानाच्या मातेचा पाय पडून केला सन्मान

  • Share this:

डेहरादून,5मार्च- डेहरादून येथे शहीद जवानांच्या शौर्य सन्मानाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्या हस्ते शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. यावेळेस व्यासपीठावरच निर्मला सीतारमन यांनी एका शहीद जवानाच्या आईच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. उत्तराखंडातील शहीद जवानांच्या शौर्य सन्मान कार्यक्रमामध्ये शहीद जवान अजित प्रधान यांच्या आई हेम कुमारी यांनाही बोलवण्यात आले होते. सीतारमन यांनी हेम कुमारींचा सन्मान केल्यानंतर व्यासपीठावरच त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.

यावेळेस निर्मला सीतारमन यांनी म्हटलं की, शहीद जवानांच्या पत्नी आणि मातांना भेटून त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले सैन्य देशाची अहोरात्र सेवा करत असतात.

First published: March 5, 2019, 9:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading