संरक्षण मंत्र्यांना आता वापरता येणार नाही सरकारी विमान; कारण...

संरक्षण मंत्र्यांना आता वापरता येणार नाही सरकारी विमान; कारण...

आचारसंहिता लागू झाल्यानं त्याचा फटका हा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांना देखील बसला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मार्च : सतराव्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून आचारसंहिता देखील लागू झाली आहे. पण, याचा फटका हा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी देखील बसला आहे. कारण, आचारसंहिता लागू झाल्यानं सरकारी विमान आता वापरता येणार नाही. रविवारी दिल्लीला येण्याकरता निर्मला सीतारामण यांनी विशेष विमानाऐवजी कमर्शिअल विमानाचा वापर करावा लागला.

ज्यावेळी लोकसभा निवडणुकींची घोषणा झाली त्यावेळी सीतारामण यांना चेन्नईला यायचं होतं. पण, आचारसंहिता लागू झाल्यानं त्यांनी सरकारी वाहन, विमान न वापरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या कमर्शिअल विमानानं दिल्लीला पोहोचल्या. यावेळी सरकारी अधिकारी देखील त्यांना विमनतळापर्यंत सोडायला आले नाहीत.

निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे काही नियमांचं पालन हे राजकीय नेत्यांना देखील करावंच लागणार आहे.

पवार-राहुल गांधी बैठक, राज ठाकरेंच्या मनसेबाबत होणार FINAL निर्णय

23 मे रोजी निकाल

सगळ्या देशाला प्रतिक्षा असलेल्या लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. 2019 मध्ये अस्तित्वात येणारी ही 17 वी लोकसभा आहे. 3 जून रोजी 16 व्या लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्या आधी नवं सरकार स्थापन होणं गरजेचं आहे. सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांची मतमोजणी 23 मे रोजी होणार असून देशाचा नवा पंतप्रधान कोण होणार हे त्याच दिवशी निश्चित होणार आहे.

2014 मध्ये ऐतिहासिक बहुमत मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्या आधी त्यांनी वर्षभर झंझावती दौरे करून आपली लाट निर्माण केली होती. अनेक दृष्टिनं ही निवडणूक ऐतिहासिक ठरली. उत्तर प्रदेशात 80 पैकी 73 जागा मिळवून भाजपने इतिहास रचला तर सहा राज्यांमध्ये सर्वच्या सर्व जागा पटाकावल्या होत्या. मात्र 2019 मध्ये ती लाट राहिली नाही याची जाणीव भाजपलाही झाली आहे. पंतप्रधान मोदी सर्व शक्ती लावत पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करताहेत. तर काँग्रेसनेही कंबर कसलीय.

2019 ची निवडणुक एकतर्फी होईल असं वर्षभरापूर्वी वाटत होतं मात्र राहुल गांधी यांनी आक्रमक होत काँग्रेसमध्ये जान आणली. राफेल सारखा मुद्दा घेऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेरीस आणलं. त्यामुळे NDA आणि UPA मध्ये जोरदार लढत होणार आहे.

SPECIAL REPORT: कोल्हापुरात कोण निभावणार मैत्री, कोण काढणार वचपा?

First published: March 11, 2019, 11:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading