Railway Budget 2020: तेजस सारख्या नव्या 150 खाजगी ट्रेन्स, सरकारची घोषणा

Railway Budget 2020: तेजस सारख्या नव्या 150 खाजगी ट्रेन्स, सरकारची घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये रेल्वेबद्दल मोठ्या घोषणा केल्या आहेत. तेजस ट्रेन्सची संख्या वाढवण्यात येणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामालाही गती येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये रेल्वेबद्दल मोठ्या घोषणा केल्या आहेत. सरकारने 27 हजार किमीच्या रेल्वे ट्रॅकच्या विद्युतीकरणाचं लक्ष्य ठेवलं आहे.  त्याचबरोबर तेजस ट्रेनची संख्या वाढवण्यात येणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Bullet Train)च्या कामालाही गती येणार आहे. खाजगी - सरकारी भागिदारीतून 150 खासगी ट्रेन चालवल्या जातील. त्याशिवाय बंगळुरूमध्ये 145 किमीची उपनगरीय रेल्वे धावणार आहे. केंद्र सरकार यासाठी 25 टक्के पैसे देईल. यावर 18 हजार 600 कोटी रुपये खर्च येणार आहे.

27 हजार किमी ट्रॅकचं इलेक्ट्रिफिकेशन

रेल्वेचं 100 टक्के विद्युतीकरण करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे.  27 हजार किलोमीटर रेल्वे ट्रॅकचं इलेक्ट्रिफिकेशन करण्यात येणार आहे. सौरऊर्जेच्या क्षमतेसाठी रेल्वे ट्रॅकच्या कडेसा पॉवर ग्रीड बनवले जातील.

'तेजस' सारख्या ट्रेन्स वाढवणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खाजगी ट्रेन्सची संख्या वाढवण्यावर भर दिला. तेजस एक्सप्रेस सारख्या ट्रेन्स वाढवल्या जाणार आहेत. सरकारने 150 नव्या खाजगी ट्रेन्स सरकारी आणि खाजगी भागिदारीतून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा : Budget 2020 : PMC बँक घोटाळ्यानंतर खातेदारांना दिलासा, 5 लाखांच्या ठेवी सुरक्षित)

तेजस ट्रेन्सची संख्याही वाढवण्यात येईल आणि या ट्रेन्स पर्यटनाच्या ठिकाणी जातील. 550 रेल्वे स्टेशन्सवर वायफाय सुविधा देण्यात येणार आहेत.

100 नवे एअरपोर्ट

देशात संरचनात्मक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार मोठी गुंतवणूक करणार आहे. यामध्ये मॉडर्न रेल्वे स्टेशन, विमानतळ, बस स्टँड, लॉजिस्टिक सेंटर्स बनवले जातील. 2024 पर्यंत देशात 100 नवे एअरपोर्ट बनवले जाणार आहेत, असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं.

(हेही वाचा : Budget 2020 : आधार कार्ड असेल तर लगेचच मिळणार पॅन कार्ड, अर्थमंत्र्यांची घोषणा)

============================================================================================

First published: February 1, 2020, 3:44 PM IST

ताज्या बातम्या