नवी दिल्ली, 11 एप्रिल : 'काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्यावर स्नायपरकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला,' असा दावा काँग्रेसनं केला आहे. त्यानंतर आता संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
'मी हा व्हिडिओ पाहिलेला नाही. पण काँग्रेसने याबाबत गृहमंत्रालयाला पत्र लिहिल्याचं ऐकलं. गृहमंत्रालय याबाबत योग्य कारवाई करेल,' असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय झालं?
'काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्यावर स्नायपरकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला,' असा दावा काँग्रेसनं केला आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिलं असून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेली सर्वात मोठी घटना आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बुधवारी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. त्यावेळी प्रियांका गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची दोन मुलं देखील हजर होती. यावेळी राहुल गांधींवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
काय कारवाई करणार?
काँग्रेसनं राजनाथ सिंह यांना पत्र लिहिलं असून त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया गृहमंत्रालयाकडून आलेली नाही. त्यामुळे गृहमंत्रालय आता काय कारवाई करणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी अनेक वेळा गर्दीमध्ये मिसळून देखील लोकांशी संवाद साधतात. त्यावेळी सुरक्षेची देखील पूर्ण काळजी घेतली जाते. पण, काँग्रेसनं केलेल्या दाव्यामुळे आता खळबळ उडाली आहे.
VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आठवले म्हणतात, 'राष्ट्रवादीच्या रामराजेंना पाठिंबा द्या'
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा