Budget 2020 : 'अर्थव्यवस्थेला लवकरच अच्छे दिन', निर्मला सीतारामन यांची नेटवर्क 18 ला खास मुलाखत

Budget 2020 : 'अर्थव्यवस्थेला लवकरच अच्छे दिन', निर्मला सीतारामन यांची नेटवर्क 18 ला खास मुलाखत

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. यानंतर नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी त्यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. आम्ही रोजगार आणि गुंतवणुकीवर भर दिला आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 1 फेब्रुवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. यानंतर नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी त्यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. आम्ही रोजगार आणि गुंतवणुकीवर भर दिला आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. अर्थव्यवस्थेला चालना देणं गरजेचं आहे. त्यासाठी मागणी आणि पुरवठा वाढवणं हे आमचं उद्दिष्ट आहे. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यामुळे देशात खाजगी गुंतवणुकीला चालना मिळाली, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा : Budget 2020 : या अर्थसंकल्पात उत्पन्न आणि रोजगारावर भर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

आम्ही इनकम टॅक्समध्ये सवलत दिली. सामान्यांचा वाचलेला पैसा गुंतवणुकीत जाणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं. करप्रणाली साधीसोपी करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्याबद्दल उत्सुक आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. या अर्थसंकल्पात कृषी आणि ग्रामीण विकासासाठी भरीव निधी देण्यात आलाय. आरोग्य, शिक्षण आणि रोजगारांवर भर दिला आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. पायाभूत संरचनेवर भर देण्यासाठी या सुविधांमध्ये 100 लाख कोटी गुंतवणार असल्याचंही त्या म्हणाल्या. वित्तीय तुटीमुळे भारताचं रेटिंग कमी होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा : CAA विरोधातील लढ्याचं केंद्र झालेल्या 'शाहीन बाग'मध्येही गोळीबार)

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांचा भारतातल्या बिझनेसवर परिणाम होणार नाही. यामुळे भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर डागाळली जाणार नाही. CAA हा नागरिकत्व देणारा कायदा आहे, नागरिकत्व काढून घेणार नाही, असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

==============================================================================================

First published: February 1, 2020, 6:43 PM IST

ताज्या बातम्या