मराठी बातम्या /बातम्या /देश /

बारामतीसाठी भाजपची रणनीती, मुख्यमंत्र्यांसमोर नवी अडणच, BMC निवडणुकीआधी भाजप-शिवसेना आमनेसामने

बारामतीसाठी भाजपची रणनीती, मुख्यमंत्र्यांसमोर नवी अडणच, BMC निवडणुकीआधी भाजप-शिवसेना आमनेसामने

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 4 सप्टेंबर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लवकरच बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावरुन भाजप 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागल्याची चर्चा आहे. शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवी अडचण समोर आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांवरुन भाजप आणि शिवसेना आमने-सामने आली आहे. टॉकटॉक स्टार सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा.

पवारांच्या पराभवासाठी भाजपची रणनीती

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लवकरच बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावरुन भाजप 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागल्याची चर्चा आहे. 'A म्हटलं की अमेठी आणि B म्हटलं की बारामती, अमेठीचा कार्यक्रम केला आहे, पण आता बारामतीचा कार्यक्रम करायचा आहे', असं सूचक विधान राम शिंदे यांनी केलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

4 आमदार बाहेर पडले तरी एकनाथ शिंदेंचा पुढील प्लान फ्लॉप

शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवी अडचण समोर आली आहे. आता कुठे सरकार स्थापन होऊन तीन महिनेच उलटले आहेत. मात्र, त्यांना आपल्यासोबत आलेल्या आमदारांच्या नाराजींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ते कॅबिनेटचा दुसरा विस्तार करू शकत नाहीत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

भास्कर जाधवांचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले मुस्लीम..

मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप दंगल घडवण्याचा प्रयत्न करेल. मुस्लिम बांधवांनी भाजपचा हा डाव ओळखावा, आरोप शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

वांद्र्यात लपून बसलेल्या संशयित दहशतवाद्याला बेड्या

बंगालच्या दहशतवादी विरोधी पथकाने महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या मदतीने एका संशयित जिहादीला ताब्यात घेतलं आहे. एटीएसने मुंबईच्या वांद्रे येथून संशियत जिहादीला बेड्या ठोकल्या आहेत. हा संशयित आरोपी एका दहशतावादी संघटनेच्या संपर्कात होता, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

Sonali Phogat मृत्यूप्रकरणात मोठी बातमी

सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आलीये. एबीपीच्या वृत्तानुसार, सोनाली फोगटच्या मृत्यूचा कट रचल्याची कबुली आरोपी सुधीर सांगवान याने दिल्याची माहिती गोवा पोलीस सूत्रांनी दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

ब्रिटिश पंतप्रधान निवडणूक: भारतीय वंशाचे ऋषी सुनक रचणार इतिहास?

ब्रिटनच्या (Britain) पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पहिले भारतीय वंशाचे खासदार बनून इतिहास रचणाऱ्या ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी शनिवारी आपली टीम आणि समर्थकांचे आभार मानून 'रेडी फॉर ऋषी' मोहिमेचा शेवट केला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

First published:

Tags: Shivsena, शरद पवार