जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांचा राजीनामा

कविंदर गुप्ता आता उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेणार आहेत.

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 30, 2018 10:14 AM IST

जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांचा राजीनामा

30 एप्रिल: रविवारी रात्री भाजपचे आमदार आणि जम्मू काश्मिरचे उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला आहे. कठुआच्या घटनेनंतर राज्यात भाजपवरचा दबाव वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातोय.

कविंदर गुप्ता आता उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेणार आहेत. गुप्ता सध्या विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती मंत्रिमंडळात आज फेरबदल करणार आहेत. या फेरबदलात काही नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12 वाजता शपथविधी होणार आहे.

कठुआ प्रकरणातील आरोपींना दोन भाजप आमदारांनी पाठिंबा दिला होता. नंतर या दोघांनी राजीनामाही दिला होता. त्यांच्या जागा भरण्याचं  आव्हानही भाजप समोर आहे. नवीन मंत्र्यांची यादी अमित शहा यांच्याकडे आहे.   कठुआ नंतर  भाजपसमोर राज्यात अनेक नवीन आव्हानं उभी राहिली आहे. यांना भाजप कसं सामोरं जातंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शपथविधी सोहळा राजभवन ऐवजी कन्वेन्शन सेंटरमध्ये होण्याची शक्यता आहे. सरकार वर्षांत दोन वेळा आपले सचिवालय बदलत असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 30, 2018 10:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close