राहुल गांधींमुळे माझा मुलगा पायलट झाला- निर्भयाची आई

राहुल गांधींमुळे माझा मुलगा पायलट झाला- निर्भयाची आई

त्या म्हणाल्या, 'राहुल गांधींनी माझा मुलगा अमनच्या कॉलेजची संपूर्ण जबाबदारी घेतली. त्यांनी वेळोवेळी फोन करुन माझ्या मुलाला प्रोत्साहन दिलं. राहुलसह प्रियांकाजीही आम्हाला फोन करुन आमची विचारपूस करतात.'

  • Share this:

02 नोव्हेंबर : 2012मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भयावरच्या सामूहिक बलात्कारानं देश हादरला होता. या प्रकरणाने देशातील सगळ्यांनाच धक्काच बसला होता. संयुक्त राष्ट्रांमध्येही या प्रकरणाची चर्चा झाली होती. त्या वेळेस निर्भयाच्या कुटुंबाला राहुल गांधींनी मदत केली होती. याच मदतीसाठी निर्भयाच्या आईने राहुल गांधींचे आभार मानले आहेत.

एका मुलाखतीत निर्भयाच्या आईने सांगितलं की, 'निर्भया गेल्यानंतर आम्ही सगळे पूर्ण तुटलो होतो. सगळं आयुष्य विखुरलं होतं. त्यावेळी अनेकांनी आमची मदत केली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आमच्या मदतीसाठी हात पुढे केला. आज त्यांच्यामुळे माझा मुलगा पायलट आहे.'

त्या म्हणाल्या, 'राहुल गांधींनी माझा मुलगा अमनच्या कॉलेजची संपूर्ण जबाबदारी घेतली. त्यांनी वेळोवेळी फोन करुन माझ्या मुलाला प्रोत्साहन दिलं. राहुलसह प्रियांकाजीही आम्हाला फोन करुन आमची विचारपूस करतात.'

त्या म्हणाल्या की, 'त्या प्रसंगानंतर आमच्या कुटुंबावर संकट कोसळलं होतं. असं वाटलं की आयुष्य संपलं आहे. पण अमन त्याच्या ध्येयापासून कधीच भरकटला नाही. एवढ्या कठीण काळातही त्याने स्वत:ला ताब्यात ठेवलं आणि 12वीचा अभ्यास पूर्ण केला. जेव्हा राहुल गांधींना समजलं की अमनला सैन्यात जायचं आहे तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की तू आधी तुझी शाळा पूर्ण कर आणि मग नंतर पायलटसाठीचं प्रशिक्षण घे.'

'2013मध्ये सीबीएसईच्या परीक्षा दिल्यानंतर अमनने रायबेलीच्या इंदिरा गांधी नॅशनल फ्लाइंग अकॅडमीत प्रवेश घेतला. तिथे राहण्याचा, खाण्याचा आणि शिक्षणाचा खर्च राहुलजींनी उचलला.'

आता अमनचं शिक्षण पूर्ण झालं आहे. गुरुग्राममध्ये त्याचं ट्रेनिंग सुरू आहे. लवकरच तो त्याचं स्वत:चं विमान आकाशात उडवेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2017 05:43 PM IST

ताज्या बातम्या