नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी नवीन डेथ वॉरंट जारी करण्यासाठी निर्भयाच्या आई-वडिलांनी दिल्ली न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज न्यायालयात सुनावणी झाली. याआधी मंगळवारी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या चारही दोषींकडून उत्तर मागितलं होतं. निर्भयाच्या आईसह दिल्ली सरकार आणि तिहार तुरुंग प्रशासनाकडून डेथ वॉरंटसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.
न्यायालयात सरकारी वकिलांनी सांगितले की, आम्ही सर्व दोषींना नोटीस पाठवली आहे. पवनच्या वकिलांनी आपण त्याचे वकील नसल्याचे सांगत नोटीस घेण्यास नकार दिला. त्यामुळे पवनला लीगल मदत दिल्यानंतर नवीन डेथ वॉरंट देण्याची मागणी केली. सध्या कोणत्याही दोषीविरुद्ध कोणतीच याचिका प्रलंबित नाही. त्यामुळे डेथ वॉरंट जारी करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत आहे. दोषी जाणीवपूर्वक या प्रकरणात अडथळा आणत आहेत.
पवनच्या वडिलांनी न्यायालयाकडे लीगल मदत देण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने वृंदा ग्रोव्हर यांना वकिलपत्र घेण्यास सांगितलं मात्र त्यांनी मी एका दोषीचे वकिलपत्र घेतले असून आता कोणतीही केस घेणार नाही असं सांगितलं. तर दोषी पवनच्या वडिलांनी न्यायालयात आम्ही स्वत:चा वकील देऊ असं सांगितलं. यावर न्यायालयाने आज का वकील घेऊन आला नाहीत असा प्रश्न विचारला. त्यावर पवनच्या वडिलांनी सांगितलं की, वकिलाने एक-दोन दिवसांत कळवेन असं सांगितलं आहे.
फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईवर न्यायालयाने पवनच्या वडिलांना सुनावले. तुम्ही अशा वकिलाकडे का गेलात. इथं सगळं लवकर करायचं आहे. तुम्ही उशिर करत असल्याचा शेरा देईन. न्यायाधीशांनी सुनावल्यानंतर पवनच्या वडिलांनी आम्ही उशिर करत नसल्याचं म्हटलं. तसेच मी उद्या वकिल घेऊन येईन असंही सांगितलं. उच्च न्यायालयाने दिलेली एक आठवड्याची मुदत संपली असल्याचे म्हणत न्यायालयाने लवकर निर्णय घ्यायचा असल्याचं सांगितलं.
Nirbhaya's mother again breaks down and leaves the courtroom saying 'I am losing faith and hope now. Court must understand the delay tactics of the convicts. Now if a new lawyer is provided to convict Pawan he/she will take his/her own time to go through case files' https://t.co/Ju60jsX4er
— ANI (@ANI) February 12, 2020
दरम्यान, न्यायालयात सुनावणीवेळी निर्भयाचे आई-वडील भावूक झाले. निर्भयाची आई ढसाढसा रडली. ती म्हणाली की, निर्भयावर अन्याय होत आहे. तिच्यावर अन्याय होऊ न देण्याची तुमची जबाबदारी आहे. तुम्ही डेथ वॉरन्ट जारी करा. आमचंही ऐका तुम्ही फक्त त्यांचेच ऐकताय असं म्हणत निर्भयाच्या आईने न्यायालयासमोर हातही जोडले.
आता माझा विश्वास आणि आशा संपत चालली आहे. न्यायालयाने दोषींकडून कायद्याची खिल्ली उडवली जात आहे हे समजून घ्यावं. आता नवा वकिल दिल्यानंतर पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेसाठी वेळ घालवला जाईल असंही निर्भयाची आई म्हणाली.
दिल्लीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसमधले मतभेट चव्हाट्यावर