• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • निर्भया प्रकरण: आरोपी विनयने भिंतीवर डोकं आपटून स्वत:ला केलं जखमी

निर्भया प्रकरण: आरोपी विनयने भिंतीवर डोकं आपटून स्वत:ला केलं जखमी

आता आरोपीचे सर्व पर्याय संपले असून सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपतींनी त्यांच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली 20 फेब्रुवारी : फाशीला काही दिवस राहिलेले असतानाच निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातला आरोपी विनय शर्मा याने भिंतीवर डोकं आपटून स्वत:ला केलं जखमी केल्याची घटना घडलीय. विनयसह सर्व चार आरोपी दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत आहेत. त्या सर्व आरोपींना वेगवेगळं ठेवण्यात आलंय. अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था तिथे आहे. मात्र असं असतानाही विनये असा प्रयत्न केल्याने खळबळ उडालीय. गेली 7 वर्ष या सर्व आरोपींवर खटला सुरू असून आता त्यांना फाशी होणार हे निश्चित झालंय. 3 मार्चला सकाळी त्यांना तिहारमध्ये फाशी दिली जाणार आहे.आपल्याला फाशी दिली जाणार हे कळल्यानंतर सर्व आरोपींची वागणूक बदललीय. काहींचं जेवण कमी झालंय तर अनेकांनी बोलणंही सोडल्याची माहिती मिळतेय. फाशीची शिक्षा झाल्यानंतर यातल्या सर्व आरोपींनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मिळणाऱ्या सगळ्या कलमांचा वापर करत फाशी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आता त्यांचे सर्व पर्याय संपले असून सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपतींनी त्यांच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. या घटनेत विनय किरकोळ जखमी झाल्याचं तुरुंग प्रशासनाने म्हटलंय. भाजपच्या माजी आमदाराचे पंचतारांकित हॉटेल उडवून देण्याची 'लश्कर-ए-तोयबा'ची धमकी फाशीच्या भीतीने खाणं-पिणं सोडलं चारही गुन्हेगारांनी फाशीच्या भीतीनं खाणं-पिणं सोडलं आहे. चौघापैंकी विनयने दोन दिवसांपासून जेवण सोडलं आहे. पवनचेही खाणं-पिणं कमी झाल्याचं तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यातुलनेत मुकेश व अक्षय या दोघांच्या वागणुकीत फारसा बदल झालेला दिसून येत नाही. मुकेशने फाशी टाळण्यासाठी सर्वच कायदेशीर प्रयत्न केले होते. याची दया याचिकाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद्र यांनी फेटाळून लावली आहे. भरधाव वेगात स्कॉर्पिओ ट्रकला धडकली, देव दर्शनावरून येणाऱ्या 6 जणांचा मृत्यू चारही आरोपींना त्यांच्या इच्छेविषयी विचारल्या काहीच प्रतिक्रिया देत नसल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले. चारही आरोपींनी गेल्या दोन दिवसांपासून खाणं-पिणंच सोडल आहे. गळ्याचं माप घेतल्यानं डोळ्यात अश्रू निर्भयाच्या चौघा नराधमांना फासावर लटकवण्यात येणार आहे. त्यासाठी चौघांच्या गळ्याचं माप घेण्यात आलं आहे. गळ्याचा माप घेताना चौघे आरोपी ढसाढसा रडले. कारण मृत्यू त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होता.  फाशी देताना सर्व नियमांचं पालन केलं जाणार असल्याचं तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.  फाशी देणाऱ्याचं वजन जेवढं अधिक तेवढं त्याला कमी उंचीवरून फासावर लटकवलं जातं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published: