निर्भयाच्या 3 आरोपींना फाशी कायम, सुप्रीम कोर्टाने फेटाळली फेरविचार याचिका

निर्भयाच्या 3 आरोपींना फाशी कायम, सुप्रीम कोर्टाने फेटाळली फेरविचार याचिका

2012च्या निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी नराधमांची फाशी कायम राहणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 जुलै : 2012च्या निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी नराधमांची फाशी कायम राहणार आहे. यावर आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. दोषींनी सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. आमची फाशी म्हणजे न्यायाच्या नावावर सरकारकडून केला जाणारा खून आहे, असा युक्तिवाद त्यांनी याचिकेत केला होता. पण त्यावर सुप्रीम कोर्टाने या नराधमांना फाशी देण्याचा निर्णय कामय ठेवला आहे.

मे 2018मध्ये हा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आणि आज अखेर यावर कोर्टाने निर्णय दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती आर. भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे, 29 वर्षीय मुकेश, 22 वर्षीय पवन गुप्ता आणि विनय शर्मा यांनी फाशीच्या शिक्षेच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती, परंतु ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे आणि त्यांना फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या 2017च्या निकालानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाने 16 डिसेंबर 2012 रोजी सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणी 23 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या आरोपींमधील राम सिंहने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. तो किशोरवयीन होता. त्याला किशोर न्यायमंडळाकडून दोषी ठरविण्यात आलं होतं. 3 वर्षांसाठी त्याला सुधार गृहातही ठेवण्यात आलं होतं.

First Published: Jul 9, 2018 02:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading