मराठी बातम्या /बातम्या /देश /

तिहार जेलमध्ये निर्भया प्रकरणातील दोषींनी कमावले लाखो रुपये

तिहार जेलमध्ये निर्भया प्रकरणातील दोषींनी कमावले लाखो रुपये

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना 22 जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे.

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना 22 जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे.

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना 22 जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे.

  • Published by:  Suraj Yadav

नवी दिल्ली, 15 जानेवारी :  देश हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील  निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना 22 जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दोषींची क्युरेटिव्ह म्हणजेच फेरविचार याचिका फेटाळली. त्यामुळे निर्भया प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा अटळ आहे.  या प्रकरणात अक्षय ठाकूर सिंह, मुकेश, पवन गुप्ता आणि विनय कुमार यांना 22 जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे.  निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देणाऱ्या पवन या जल्लादला एका दोषीला फाशी देण्याचे 15 हजार रुपये मिळणार आहेत. त्यानुसार चारही दोषींना फाशी देण्यासाठी जल्लादला तब्बल 60 हजार रुपये मिळणार आहेत. गेल्या सात वर्षांपासून हे चौघे तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

तुरुंगात असताना त्यांना तेथील नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. शिवाय तुरुंगात मजुरी केल्यानंतर त्याचे मानधनही मिळते. या चौघांनी गेल्या सात वर्षांत लाखो रुपयांची कमाई केली आहे. या चौघांनी गेल्या सात वर्षांत तब्बल 1 लाख 37 हजार रुपये कमावले आहेत. तुरुंगात मजुरी केल्याबद्दल अक्षयने 69,000 रु., विनयने 39,000 रु.  आणि पवनने 29,000 रुपये कमावले आहे. चौथा दोषी मुकेशने या दरम्यान काहीच काम केले नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मिळालेल्या निधीचे काय करायचे याबाबत दोषींनी अद्याप काहीही ठरविलेले नाही. मात्र मृत्यूपूर्वी त्यांनी याबाबत निर्णय न दिल्यास हा निधी त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात येण्याची शक्यता आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी विनय तणावात

दोषी विनय याच्या वडिलांनी त्याची तिहार तुरुंगात भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दोषींच्या तुलनेत विनय अधिक तणावात दिसून येत आहे. तो अत्यंत अस्वस्थ आहे. तिहार तुरुंगातील अनेक नियमभंगामध्ये त्याचे नाव आहे. यासाठी त्याला सर्वाधिक शिक्षाही मिळाली आहे. तुरुंगात असताना तेथील नियम पाळणे अनिवार्य असते. अन्यथा तुरुंग प्रशासनाकडून शिक्षा दिली जाते. यामध्ये विनयला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 11 वेळा, मुकेशला 3, पवनला 8 तर अक्षयला एक वेळा शिक्षा देण्यात आली आहे.

First published:

Tags: Hang till death, Nirbhaya rape and murder case, Tihar jail