निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्याआधी तिहार जेलने मागवली केळी, काय आहे कारण?

निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्याआधी तिहार जेलने मागवली केळी, काय आहे कारण?

निर्भयाच्या गुन्हेगारांना तिहार तुरुंग प्रशासनाकडून फाशी देण्याची तयारी पूर्ण केली आहे. फाशीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी तुरुंग प्रशासनाकडून ट्रायलही घेण्यात आली आहे.

  • Share this:

नई दिल्ली, 14 जानेवारी: निर्भयाच्या गुन्हेगारांना लवकरच फासावर लटकवलं जाणार आहे. त्यासाठी दिल्लीतील तिहार तुरुंग प्रशासनाकडून फाशी देण्याची तयारी पूर्ण केली आहे.  फाशीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी तुरुंग प्रशासनाकडून ट्रायलही घेण्यात आली आहे. दरम्यान, फाशीच्या शिक्षेची तयारी करताना तिहार जेलने केळी मागवल्या आहेत. फाशीचा दोर खराब होऊ नये यासाठी केळींचा वापर केला जातो. फाशीच्या वेळी दोरखंड खऱाब होणं, किंवा इतर कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तयारी केली जात आहे.

फाशीसाठी वापरण्यात येणारा दोर व्यवस्थित राहावं याचीही काळजी तुरुंग प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. दोरखंड मुलायम राहावी यासाठी केळीचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी तुरुंग प्रशासनानं केळी विकत घेतली असल्याची माहिती आहे. केळीचा भुगा करून ते फाशी देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोरीला लावण्यात येतो.  केळीचा भुगा दोरीला लावल्यानंतर तो दोरखंड मुलायम राहतो. तसेच फाशीची गाठ वर खाली करताना अडचण येत नाही. फक्त केळीच नाही तर इतर वस्तूंचा वापरही करण्यात येतोय. फाशी देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चारही दोरींची ट्रायल घेण्यात आली आहे.

गळ्याचं माप घेतल्यानं डोळ्यात अश्रू

निर्भयाच्या चौघा नराधमांना फासावर लटकवण्यात येणार आहे. त्यासाठी चौघांच्या गळ्याचं माप घेण्यात आलं आहे. गळ्याचा माप घेताना चौघे आरोपी ढसाढसा रडले. कारण मृत्यू त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होता.  फाशी देताना सर्व नियमांचं पालन केलं जाणार असल्याचं तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.  फाशी देणाऱ्याचं वजन जेवढं अधिक तेवढं त्याला कमी उंचीवरून फासावर लटकवलं जातं असल्याचं सांगण्यात आलं आहे.

8 दोरखंडांची फाशीसाठी ट्रायल

चौघांना फासावर लटकवण्यासाठी चार दोर तयार आहे. त्या दोरींची ट्रायलही घेण्यात आली आहे. मात्र  याशिवाय आणखी चार दोर तयार ठेवण्यात आले आहे. फाशी देण्यासाठी एकून आठ दोर तयार आहे.  फाशी देताना कोणत्याही दोरीत अडचणी आल्या तर लगेच दुसरी दोरी तयार ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या फाशीसाठीच्या सर्व ट्रायल यशस्वी झाल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.

फाशी देताना दोर तुटला तर शिक्षा माफ होते का?

फाशीची संपूर्ण जबाबदारी ही जल्लादाची असते. मात्र तुरुंगाच्या नियमानुसार फाशी देताना फास जर तुटला तर दोषीची शिक्षा माफ होते का? याबाबत तिहार जेलमधील फाशीची अंमलबाजवणी करणाऱ्या पवन जल्लादने खुलासा केला आहे. "जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याचं ठरत तेव्हा संपूर्ण खबरदारी घेतली जात असते. देशात आजपर्यंत तरी फाशी देताना दोरखंड तुटल्यामुळे कुणाचीही शिक्षा रद्द झाल्याची घटना घडली नाही. फाशीची अंमलबजावणीही ठरल्याप्रमाणे बजावली गेली आहे",असे पवन यांनी सांगितले.

फाशीच्या एक दिवस आधी काय होते?

जेव्हा एखाद्या दोषीची फाशी देण्याची तारीख निश्चित केली जाते तेव्हा एक दिवस आधी आम्हाला जेलमध्ये बोलवण्यात येतं. त्यानंतर त्या आरोपीला फाशी देण्यासाठी प्रक्रिया सुरू होते. फाशी देण्यासाठी कुठला  दोर वापरायचा? फास कसा बांधायचा? ज्या दिवशी एका दोषीला फाशी द्यायची असते त्या रात्री आम्हाला झोप येत नाही, असं पवन यांनी सांगितलं. तसेच, जेव्हा दोषीला फाशी द्याची वेळ ठरलेली असते, त्याआधी 15 मिनिटांपूर्वी आम्ही फाशी देण्याच्या ठिकाणी पोहोचतो. त्यानंतर दोषीला फासावर लटकावलं जाते. कैद्याला जेव्हा जेलमधून आणलं जातं तेव्हा त्याच्या हातात बेड्या असतात किंवा दोरीने हात बांधलेले असतात. दोन पोलीस कर्मचारी त्याला घेऊन येत असतात. जेलपासून ते फाशी देण्याच्या ठिकाणापर्यंत हा वेळ 15 मिनिटांचा असतो.

पोलिसांसाठीही असतात काही नियम

फाशी देत असताना त्या ठिकाणी 4 ते 5 पोलीस कर्मचारी हजर असतात. ते काहीच बोलत नाहीत, फक्त एकमेकांना इशारे देत असतात. जर कुणी काही बोललं तर दोषी हा भावनाविवश होऊन जातो आणि नको ती मागणी करू लागतो. त्यामुळे त्यावेळी कुणीही बोलत नाही. त्याशिवाय या ठिकाणी जेल अधीक्षक, उपअधीक्षक आणि डॉक्टरांची टीम हजर असते. मुख्य म्हणजे जल्लाद पवन कुमारच्या परिवाराने आतापर्यंत 25 जणांना फासावर लटकावलं आहे.

लॅक वॉरंट म्हणजे काय?

लॅक वॉरंट म्हणजे दोषींना दिल्या जाणाऱ्या फाशीचा आदेश देणारं पत्र असतं. यामध्ये आरोपींना फाशी कधी द्यावी याबाबत लिहिलेलं असतं. त्या वेळेनुसार आरोपीला तुरुगांतून बाहेर काढलं जातं. काही वेळा कैद्याला खांद्यावर उचलून फाशीच्या ठिकाणापर्यंत नेण्यात येतं. त्याचं कारण असं की आपल्याला आता फासावर चढवणार या भीतीनं कैद्याचे हातपाय लटपटायला लागतात. त्यामुळे त्यांना चालताही येत नाही. आरोपीला फाशीच्या दोरखंडापर्यंत आरोपीचा चेहरा काळ्या कपड्यानं झाकून घेण्यात येतो. त्यामुळे आजूबाजूला नेमकं काय घडतंय हे आरोपीला समजू नये याची संपूर्णपणे खात्री घेतली जाते.

फाशी देताना दोर तुटला तर शिक्षा माफ होते का?, वाचा काय आहे नियम

नराधम आरोपींना फाशीवर लटकवून कायमचं संपवणाऱ्या जल्लादला किती असतो पगार?

 

Published by: Manoj Khandekar
First published: January 14, 2020, 3:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading