नवी दिल्ली, 31 जानेवारी : निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींना उद्या फाशी देण्यात येणार नाही. त्यांची फाशी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निर्भया प्रकरणी फाशी आगामी आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या 1 फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या चारही दोषींना फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. मात्र दिल्ली न्यायालयाने फाशीची शिक्षा पुढे ढकलली आहे.
2012 Delhi gang-rape case: A Delhi Court stays execution of convicts till further orders pic.twitter.com/jdg28SSDmN
— ANI (@ANI) January 31, 2020
काही वेळापूर्वीच पवनची न्यायिक समीक्षा याचिका फेटाळण्यात आली होती. निर्भया प्रकरणातील सामूहिक बलात्कार व हत्या करणाऱ्य़ा दोषीने सर्वोच्च न्यायालयात न्यायिक समीक्षा सादर केली होती. निर्भयाचे गुन्हेगार फाशीची शिक्षा टाळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पवनची समीक्षा याचिका फेटाळली आहे. निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणानंतर पवन कुमारकडून अल्पवयीन असल्याचा दावा करण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयात निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणात दोषी पवन शर्माची याचिका फेटाळण्यात आली आहे. या याचिकेवर पवनकडून दावा करण्यात आला होता की, जेव्हा बलात्काराची घटना झाली होती तेव्हा पवन हा अल्पवयीन होता म्हणजेच त्याचे वय 18 पेक्षा कमी होते. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निर्भया प्रकरणातील दोषींपैकी अक्षय कुमार सिंह याची सुधारात्मक याचिका फेटाळली होती. न्यामूर्ती एनवी रमण, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती आरएफ नरीमन, न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंड़पीठाने दोषी सिंह याची सुधारात्मक याचिका फेटाळली होती. सोबतच खंडपीठाने 1 फेब्रुवारी रोजी दिली जाणारी फाशीच्या शिक्षा पुढे ढकलण्यासाठी केलेली याचिका फेटाळली होती.
दरम्यान तिहार तुरुंगात प्रशासनाने निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी डमी फाशी देण्यात आली होती.
न्यायालयाने मौखिक सुनावणीची याचिका फेटाळली
खंडपीठाने सांगितले की, मौखिक सुनावणीचा अर्ज बरखास्त करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nirbhaya gang rape case