Nirbhaya Case: सुप्रीम कोर्टात फेल झाले आरोपी मुकेशचे सगळे प्रयत्न, दया याचिकाही फेटाळली

Nirbhaya Case: सुप्रीम कोर्टात फेल झाले आरोपी मुकेशचे सगळे प्रयत्न, दया याचिकाही फेटाळली

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फाशी कधी दिली जाणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. दुसरीकडे मात्र फाशीची तारीख टाळण्यासाठी दोषींकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जानेवारी : निर्भया सामूहिक बालात्कार प्रकरणी दोषी मुकेश सिंहची आणखी एक याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मुकेशने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करत  सर्वोच्च न्यायालयात आव्हान केले होते. मुकेशने आपल्या याचिकेत तुरुंगात शोषणाचे कारण दिले होते. कोर्टाला त्याचे सर्व युक्तिवाद निराधार वाटले. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत म्हटले आहे की, तुरूंगातील अत्याचार हा दया याचिका फेटाळण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयाचा आढावा घेणारा आधार असू शकत नाही.

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फाशी कधी दिली जाणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. दुसरीकडे मात्र फाशीची तारीख टाळण्यासाठी दोषींकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. काल मंगळवारी दोषी मुकेश सिंह कुमार याच्यावर तुरुंगात लैंगिक छळ होत असल्याचा आरोप त्याच्या वकिलाने केला होता. त्यानंतर आज दोषी अक्षय सिंहने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पुनर्विचार याचिका दाखल केली. अक्षयनंतर विनयदेखील आज राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करणार आहे. 2012 मध्ये दिल्ली येथे झालेल्या सामूहिक बलात्कारात चार दोषी मुकेश, अक्षय, पवन आणि विनय यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्वांना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार आहे.

मुकेश सिंहची याचिका कोर्टाने फेटाळली

निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंहने तिहार तुरुंगात लैंगिक छळाचा आरोप करत असून राष्ट्रपतीने दया याचिका फेटाळण्याला त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावर आज सर्वोच्च न्यायालयात मुकेशची याचिका फेटाळली आहे. सरकारने मुकेशच्या याचिकेवर जोरदार विरोध केला आणि ही याचिका स्वीकार करण्या लायक नसल्याचे सांगितले.

दोषीच्या वडिलांनी याचिका फेटाळली

दिल्लीच्या न्यायालयात सोमवारी एक दोषी पवन गुप्ताचे वडील हिरालाला यांची याचिका फेटाळण्यात आली. हिरालाल यांनी कनिष्ठ न्यायालयात निर्भया प्रकरणातील एकमात्र साक्षीदाराविरोधात FIR दाखल केली होती, ज्याला कोर्टाने 6 जानेवारी रोजी फेटाळले. निर्भयाने आईने न्यायालयावर विश्वास व्यक्त केला आहे. या प्रकरणातून सोडवण्यासाठी दोषींनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतील, असा विश्वास असल्याचे मत निर्भयाच्या आईने व्यक्त केले. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवनच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका पाटियाला हाउस कोर्टच्या सेशन कोर्टाने फेटाळून लावली आहे.

6 जानेवारीला मेट्रोपोलिटियन मॅजिस्ट्रेटने पवनच्या वडिलांची याचिका फेटाळली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की, या प्रकरणामध्ये एकमेव साक्षीदाराने माध्यमांकडून पैसे घेऊन साक्ष दिली होती. यामुळे त्याची साक्ष सत्य आहे म्हणता येणार नाही. पवनशिवाय या प्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंगनेसुद्धा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याविरोधात त्याने दाखल केलेल्या याचिकेवर तात्काळ सुनावणीची मागणी केली होती.

सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटलं की, जेव्हा एखाद्याला फाशी देण्यात येणार असेल तर त्याला प्राधान्य देण्यापेक्षा दुसरं काही गरजेचं असू शकत नाही. 2012 मध्ये निर्भयावर झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर देश हादरला होता. नराधमांनी बलात्कार केल्यानंतर तिला रस्त्यावर फेकून दिलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी निर्भयाचा मृत्यू झाला. यातील दोषी मुकेश कुमारची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 17 जानेवारीला फेटाळून लावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2020 08:30 AM IST

ताज्या बातम्या