Elec-widget

निर्भया प्रकरण : चारही दोषींची फाशी सुप्रीम कोर्टाकडून कायम

निर्भया प्रकरण : चारही दोषींची फाशी सुप्रीम कोर्टाकडून कायम

आपल्याला न्याय मिळेल अशी आशा निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

  • Share this:

05 मे : देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील चारही दोषींची याचिका फेटाळण्यात आली असून फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

16 डिसेंबर 2012ला दिल्लीत झालेल्या या अमानूष बलात्काराने अवघा देश हादरला होता. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात आंदोलनंही झाली होती. या प्रकरणात एकूण सहा आरोपी होते. त्यापैकी एक आरोपी राम सिंहने आत्महत्या केली, तर एक आरोपी अल्पवयीन होता. बालसुधारगृहात 3 वर्षाच्या शिक्षेनंतर त्याची सुटका झाली आहे.

दरम्यान, अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश या चार दोषींना दिल्ली सत्र न्यायालय आणि दिल्ली हाय कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर आज अंतिम निकाल देण्यात आला. सुप्रीम कोर्टाने चारही आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.

काय आहे निर्भया प्रकरण?

- 16 डिसेंबर 2012 - चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार

Loading...

- त्यानंतर तिची अमानुष हत्या, त्यात तिचा मृत्यू

- एकूण 6 दोषी

- त्यापैकी राम सिंहची आत्महत्या

- एक अल्पवयीन दोषी, बालसुधारगृहात 3 वर्षाच्या शिक्षेनंतर सुटका

- दोषींची नावं - अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश

- दिल्ली उच्च न्यायालयानं 4 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती

- दोषींची सर्वोच्च न्यायालयात धाव

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2017 12:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com