मराठी बातम्या /बातम्या /देश /

निर्भया प्रकरणातल्या दोषींची फाशी पुन्हा लांबणीवर

निर्भया प्रकरणातल्या दोषींची फाशी पुन्हा लांबणीवर

 फाशीची शिक्षा माफ व्हावी म्हणून आरोपींना राष्ट्रपतींकडे दयेची याचिका करण्याचा अधिकार आहे. आणि ही याचिका फेटाळल्यानंतरच शिक्षेवर अंमलबजावणी करता येते.

फाशीची शिक्षा माफ व्हावी म्हणून आरोपींना राष्ट्रपतींकडे दयेची याचिका करण्याचा अधिकार आहे. आणि ही याचिका फेटाळल्यानंतरच शिक्षेवर अंमलबजावणी करता येते.

फाशीची शिक्षा माफ व्हावी म्हणून आरोपींना राष्ट्रपतींकडे दयेची याचिका करण्याचा अधिकार आहे. आणि ही याचिका फेटाळल्यानंतरच शिक्षेवर अंमलबजावणी करता येते.

  • Published by:  Ajay Kautikwar
नवी दिल्ली 15 जानेवारी : सगळ्या देशाला प्रतिक्षा असलेल्या निर्भया प्रकरणातल्या दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर पडलीय. या आरोपींना 22 तारखेला फाशी देणं शक्य नाही असं दिल्ली सरकारने म्हटलं आहे. पुन्हा एका आरोपीने दयेची याचिका दाखल केल्याने त्या तारखेला फाशी देणं शक्य नाही. या प्रकरणात चार आरोपींना सुप्रीम कोर्टानं दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र ही फाशी लांबणीवर टाकण्यासाठी आरोपी आपले सर्व उपाय अवलंबत आहे. फाशीची शिक्षा माफ व्हावी म्हणून आरोपींना राष्ट्रपतींकडे दयेची याचिका करण्याचा अधिकार आहे. आणि ही याचिका फेटाळल्यानंतरच शिक्षेवर अंमलबजावणी करता येते. या आधी राष्ट्रपतींनी काही याचिका फेटाळल्या होत्या. फासावर चढविण्याचे जल्लादला मिळणार 60 हजार रुपये निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देणाऱ्या पवन या जल्लादला एका दोषीला फाशी देण्याचे 15 हजार रुपये मिळतात. त्यानुसार चारही दोषींना फाशी देण्यासाठी जल्लादला तब्बल 60 हजार रुपये मिळणार आहेत. सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना दिलासा नाहीच, 13 फेब्रुवारीला फैसला निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी विनय तणावात दोषी विनय याच्या वडिलांनी त्याची तिहार तुरुंगात भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दोषींच्या तुलनेत विनय अधिक तणावात दिसून येत आहे. तो अत्यंत अस्वस्थ आहे. तिहार तुरुंगातील अनेक नियमभंगामध्ये त्याचे नाव आहे. यासाठी त्याला सर्वाधिक शिक्षाही मिळाली आहे. विनयला नियमांचे उल्लंघन करण्यासाठी 11 वेळा, मुकेशला 3, पवनला 8 तर अक्षयला एक वेळा शिक्षा मिळाली आहे. याव्यतिरिक्त तुरुंगात काम केल्याबद्दल अक्षयने 69,000 रु., विनयने 39,000 रु.  आणि पवनने 29,000 रुपये कमावले आहे. चौथा दोषी मुकेशने या दरम्यान काहीच काम केले नसल्याचे सांगितले जात आहे. गेला नवरा कुणीकडे? अमेरिकेतील पतीसाठी मराठी महिलेने केलं असं आंदोलन या प्रकऱणातला एक दोषी रामसिंह याने तुरुंगात आत्महत्या केली होती. आरोपी अक्षय याने 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये बलात्कार करून तिला मारहाणही केली होती. पवन यानेही निर्भयावर बलात्कार करून तिच्या मित्राला बेदम मारहाण केली होती. मुकेश ही बस चालवत होता. त्यानेही निर्भयासोबत कुकृत्य केले होते. विनय याने निर्भयाचा छळ, बलात्कार, नंतर तिला बसबाहेर फेकले होते.
First published:

Tags: Nirbhaya gang rape case

पुढील बातम्या