Home /News /national /

माझ्या लेकीला न्याय मिळाला, निर्भयाची आईची पहिली प्रतिक्रिया

माझ्या लेकीला न्याय मिळाला, निर्भयाची आईची पहिली प्रतिक्रिया

देशाला हादरावून सोडणाऱ्या निर्भया गँगरेप प्रकरणातील दोषींचा अखेर फैसला झाला आहे.

    नवी दिल्ली, 07 जानेवारी :  देशाला हादरावून सोडणाऱ्या निर्भया गँगरेप प्रकरणातील दोषींचा अखेर फैसला झाला आहे.  2012 मध्ये दिल्लीतील निर्भया गँगरेप (Nirbhaya Gangrape Case) प्रकरणातील 4 दोषींना 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता फासावर लटवले जाणार आहे. कोर्टाच्या या निर्णयाबद्दल निर्भयाच्या आईने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. २०१२ मधील सामूहिक बलात्कार पीडित निर्भयाची आईने कोर्टाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया दिली. 'माझ्या मुलीला न्याय मिळाला आहे. दोषींना फाशी देण्यात आल्यामुळे देशातील महिला सशक्त होतील. या निर्णयामुळे न्यायालयीन यंत्रणेवरील लोकांचा विश्वास बळकट होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आज, पतियाला हाऊस कोर्टाने निर्भयाच्या चार दोषींच्या फाशीच्या शिक्षेचा अखेर वारँट जारी केला आहे. 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता या चारही नराधमांना फासावर लटकवणार आहे. तसंच या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शीविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची याचिकाही फेटाळली. काय प्रकरण आहे? हे प्रकरण 16 डिसेंबर 2012 च्या रात्रीचे आहे. चालत्या बसमध्ये एका 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर 6 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. नराधम आरोपींनी माणुसकीच्या सर्व मर्यादा सोडून पीडितेवर अत्याचार केले होते. नंतर तिला मृत्यूच्या मार्गी फेकण्यात आले. काही दिवसांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या गुन्ह्यासाठी पवन, मुकेश, अक्षय आणि विनय या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच वेळी, मुख्य आरोपी रामसिंगने खटल्याच्या वेळीच तिहार तुरुंगात आत्महत्या केली, तर आणखी एका अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात 3 वर्षानंतर सोडण्यात आले. निर्भया प्रकरणात चारही आरोपींना एकाच वेळी देणार फाशी, तिहार जेलमध्ये केली तयारी निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार दोषींना एकाच वेळी फाशी देण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीच्या तिहार जेलमध्ये फाशी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आधी एका-एकाला फाशी देण्यात येणार होती पण आता चारही आरोपींना एकाच वेळी फाशी देण्यात येणार आहे. तशा तयारीलाही सुरुवात करण्यात आली आहे. तिहार जेल देशातील असं पहिलं कारागृह आहे, जिथे एकाच वेळी चार आरोपींना फाशी देण्यात येणार आहे. आतापर्यंत इथे फक्त फाशी देण्याकरिता एकच जागा होती, परंतु आता त्यांची संख्या 4 करण्यात आली आहे. तिहार कारागृहाच्या आत फ्रेम्स तयार करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) सोमवारी पूर्ण केलं. हे काम पूर्ण करण्यासाठी जेलमध्ये जेसीबी मशीनदेखील आणण्यात आलं होतं. असं तिहार जेलच्या सूत्रांनी सांगितलं आहे. जेसीबी मशीनच्या सहाय्याने तीन नवीन हँगिंग फ्रेम आणि बोगदे तयार करण्यात आले आहेत. सूत्रांनी सांगितले की, लटक्या फळ्याखाली बोगदा देखील बांधला गेला आहे. या बोगद्यात लटकल्यानंतर मृत कैद्याचा मृतदेह बाहेर काढला जातो. सद्यस्थितीत तीन नवीन हँगिंग बोर्डासमवेत जुनी फळीही बदलण्यात आली आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Nirbhaya

    पुढील बातम्या