निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीवर प्रश्नचिन्ह, काय आहेत कारणं?

निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीवर प्रश्नचिन्ह, काय आहेत कारणं?

निर्भयाच्या दोषींना उद्या फाशी होणार की नाही याचा निर्णय थोड्याच वेळात समोर येईल

  • Share this:

नवी दिल्ली, 31 जानेवारी :  निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशी देणार असल्याचा निर्णय देण्यात आला असला तरी अद्यापही त्यांची फाशी पुढे ढकलली जाण्याची शक्यता वाढली आहे. दोषी मुकेश व्यतिरिक्त इतर तीन दोषींकडे अद्यापही राष्ट्रपतींना दया याचिका पाठविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. दोषी विनयने राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवली आहे. जर राष्ट्रपतींनीही दया याचिका फेटाळली तर तिघेही मुकेश प्रमाणे या निर्णयाची न्यायिक समीक्षा घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. निर्भयाच्य़ा दोषींचे वकील एपी सिंह यांच्याकडून पतियाळा हाऊस न्यायालयात अर्ज दाखल करुन फाशीची तारीख पुन्हा एकदा वाढवण्याची मागणी केली आहे. दोषींकडून यंदा दिल्ली प्रिजन नियमांचा हवाला देण्यात आला आहे. निर्भयाच्या सर्व दोषींचे वकील एपी सिंह यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली तुरुंगातील संबंधित नियमांचा हवाला देण्यात आला आहे. एपी सिंह यांनी याचिकेत दिल्ली प्रिजन नियमांचा उल्लेख करीत म्हटले आहे, की चारपैकी कोणत्याही दोषींना तेव्हापर्यंत फाशी दिली जाऊ शकत नाही जोपर्यंत शेवटच्या दोषीचा दया याचिकांसह सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर केला जात नाही.

विनयची पुनर्विचार याचिका अद्याप प्रलंबित

बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना विनयने दया याचिका पाठवली आहे. दोषी विनयची पुनर्विचार याचिका यापूर्वीच फेटाळण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी दोषी मुकेश सिंह याची दया याचिका 17 जानेवारी रोजी फेटाळली होती. या निर्णयाची न्यायिक समीक्षेची याचिकादेखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अशा परिस्थितीत मुकेशकडे फाशीची शिक्षा वाचवण्यासाठी दुसऱा पर्याय उपलब्ध नाही.

चारही दोषींची सध्याची परिस्थिती

-दोषी मुकेश सिंहची पुनर्विचार याचिका आणि दया याचिका दोन्ही फेटाळण्यात आली आहे. त्याच्याक़डे आता कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध नाही.

-दोषी अक्षय ठाकूरची पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली आहे. आता त्याच्याकडे दया याचिकेचा पर्याय उपलब्ध आहे.

-दोषी विनय शर्माची पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली आहे आणि त्याने राष्ट्रपतींना दया याचिका पाठवली आहे.

-दोषी पवन गुप्ताकडे अद्याप दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. तो पुनर्विचार याचिका आणि दया याचिका दोन्ही दाखल करू शकतो.

First published: January 31, 2020, 11:20 AM IST

ताज्या बातम्या