निर्भया बलात्कार प्रकरणातल्या गुन्हेगाराने स्वतःच घेतली दया याचिका मागे; राष्ट्रपतींकडे केली मागणी

निर्भया बलात्कार प्रकरणातल्या गुन्हेगाराने स्वतःच घेतली दया याचिका मागे; राष्ट्रपतींकडे केली मागणी

16 डिसेंबर 2016 रोजी निर्भया बलात्कार प्रकरणी न्यायालयाने सर्व आरोपींन फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 डिसेंबर : निर्भया बलात्कार प्रकरणी सर्व आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा न्यायालयानं सुनावली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चार आरोपीपैंकी एकाची सुटका करण्यात यावी, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आता या प्रकरणातील दोषी विनय शर्मा यांने स्वत:च आपली दया याचिका मागे घेण्याची मागणी केली आहे. दोषी विनय शर्मा यानं, “या याचिकेवर मी सही केलेली नाही, त्यामुळे ही याचिका मागे घेण्यात यावी”, असा युक्तिवाद केला आहे.

16 डिसेंबर 2016 रोजी निर्भया बलात्कार प्रकरणी न्यायालयाने सर्व आरोपींन फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर विनय शर्मा या दोषीनं दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्यात यावी, अशी मागणी गृहमंत्रालयाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. महिलांची सुरक्षा ही एक गंभीर समस्या आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हेगारांना दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असू नये, असे वक्तव्य रामनाथ कोविंद यांनी केले होते. आता या प्रकरणातील दोषी विनय शर्मा यानं आपली दया याचिका मागे घेतली आहे.

वाचा-नवरदेवासह नातेवाईकांना अर्धनग्न करून केली मारहाण, धक्कादायक कारण समोर!

वाचा-गृहकलह: बापानेच केली पोटच्या मुलाची हत्या, डोक्यात घातला हातोडा

दया याचिका फेटाळण्याची केली होती मागणी

सर्वप्रथम दया याचिका फेटाळण्यासाठी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे ही याचिका पाठविली होती. दोन दिवसांनंतर गृहमंत्रालयाने ते राष्ट्रपतींकडे सादर केले. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ही फाईल विचारविनिमय व अंतिम निर्णयासाठी राष्ट्रपतींकडे पाठविली आहे. गृहनिर्माण मंत्रालयानेही निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींसाठी दया याचिकेची शिफारस केली होती. दरम्यान राष्ट्रपतींनी पॉक्सो कायद्यांतर्गत शिक्षा झालेल्यांना माफी मिळू नये, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी सांगितले. अशा वेळी दया याचिकेची तरतूद संपली पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते.

वाचा-महाराष्ट्रात हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती, बलात्कारानंतर महिलेची हत्या

न्यायालयानं दिली आहे फाशीची शिक्षा

या प्रकरणातील गुन्हेगारांपैकी एक विनय शर्मा याला 23 वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार आणि तिचा खून केल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. विशेष म्हणजे निर्भया सामूहिक बलात्काराची घटना 16 डिसेंबर 2012 रोजी घडली होती.

वाचा-मुंबईत मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत तरुणीचा नाहक बळी, संतप्त नातेवाईकांचं आंदोलन

7 वर्ष शिक्षेची वाट पाहत आहे

2012मध्ये घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणी आरोपींना 7 वर्षांआधी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. चालत्या बसमध्ये निर्भयावर (नाव बदले आहे) निर्दयपणे बलात्कार केला. सामूहिक बलात्कारानंतर निर्भयाने इस्पितळात 13 दिवस जगण्यासाठी संघर्ष केला. अखेर 29 डिसेंबर 2012ला त्यांचे निधन झाले. या सामूहिक बलात्काराचा जगभरात निषेध करण्यात आला. मात्र 7 वर्षांनंतरही अद्याप या आरोपींना फाशी देण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2019 04:19 PM IST

ताज्या बातम्या