तयारी सुरू...'निर्भया' बलात्कार प्रकरणातल्या दोषींना 'या' तारखेला होऊ शकते फाशी

तयारी सुरू...'निर्भया' बलात्कार प्रकरणातल्या दोषींना 'या' तारखेला होऊ शकते फाशी

शिक्षेची अंमलबजावणी लाबंणीवर पडावी यासाठी आता चौथ्या आरोपीनें सुप्रीम कोर्टात याचि दाखल केलीय.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 12 डिसेंबर : देशभर गाजलेल्या निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातल्या दोषींना लकरच फाशी होण्याची शक्यता आहे. 2012मधल्या डिसेंबरमध्ये हे प्रकरण घडलं होतं त्यानंतर देशभर प्रचंड असंतोष उफाळला होता. यातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र 7 वर्षानंतरही त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. हैदराबाद एन्काउंटर प्रकरण घडल्यानंतर देशभर प्रचंड असंतोष निर्माण झाला. आरोपींना शिक्षाच होत नसेल तर गुन्हेगारांवर वचक कसा बसणार असा सवाल विचारला जातोय. त्या पार्श्वभूमीवर निर्भया प्रकरणातल्या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. निर्भया प्रकरणातले सर्व आरोपी हे सध्या तिहार तुरुंगात आहेत. या आरोपींपैकी तीन जणांनी राष्ट्रपतींकडे केलेली दयेची याचिका फेटाळून लावण्यात आली होती. त्यानंतर विनय शर्मा या चौथ्या आरोपीने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केलाय. हा अर्ज फेटाळून लावण्यात यावा अशी शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींकडे केलीय. याच प्रकरणाचा पुनर्विचार करावी असा अर्जही विनय शर्माने सुप्रीम कोर्टात केलाय. त्यावर 17 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

ही सुनावणी संपल्यावर केव्हाही या आरोपींना फाशी होऊ शकते. तिहारमध्ये शिक्षेच्या अंमलबजावणीची तयारी सुरू असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. त्यासाठी जल्लादाचीही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती असून मिरतचे पवन जल्‍लाद (Pawan Jallad) हे फाशीची शिक्षा देणार आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर काळी वेळातच 17 डिसेंबरला किंवा 18 डिसेंबरला ही अंमलबजावणी केली जाऊ शकते.

फाशी देण्यासाठी असते फक्त सकाळची वेळ, जल्लाद शेवटी कैद्याच्या कानात म्हणतो...!

शिक्षेच्या अंमलबजावणीचं ट्रायलही झालं.

शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी डमी ट्रायलही करण्यात आलं आहे. मात्र, आरोपींना फाशी देण्याचे अद्याप जेल प्रशासनाकडे पत्र आलेले नाही. निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावलेल्या तिहारमधील दोषींची दया याचिका फेटाळण्यात आली आहे.

सात वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयासोबत चालत्या बसमध्ये सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. दोषी ठरविण्यात आलेल्या सहा अल्पवयीन मुलांपैकी एकाला आता सोडून देण्यात आलं. त्याचवेळी तिहारमध्येच एका आरोपी रामसिंगने आत्महत्या केली. उर्वरित चार दोषींना लवकरच फाशी देण्यात येईल. सूत्रांनी सांगितले की, तिहार जेल प्रशासनाने डमीमध्ये 100 किलो वाळू भरून चाचणी घेतली. याचा हेतू असा होता की, जर दोषींना फाशी देण्यात आली तर लटकवलेली विशेष दोरी त्यांच्या वजनाने तुटेल का?

हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणात समोर आलं नवं CCTV फुटेज

फाशी देण्यासाठी जो दोर दोरखंड लागतो तो करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीचा वापर करावा लागतो. देशात अतिशय मोजक्याच ठिकाणी हा दोरखंड तयार केला जातो. बिहारच्या बक्सर कारागृहात यासाठी दोरखंड तयार करण्याचं काम सुरू आहे. फाशीला लागणारे 10 दोरखंड तयार करण्याची ऑर्डर या कारागृहाला मिळाली आहे. त्याचा वापर निर्भया प्रकरणातल्या आरोपींना फाशी देण्यासाठी केला जावू शकतो अशी शक्यता व्यक्त केलीय जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 06:37 PM IST

ताज्या बातम्या