Nirbhaya Gangrape Case अल्पवयीन म्हणून 3 वर्षात सुटलेल्या निर्भयाच्या पाचव्या गुन्हेगाराचं काय झालं?

Nirbhaya Gangrape Case अल्पवयीन म्हणून 3 वर्षात सुटलेल्या निर्भयाच्या पाचव्या गुन्हेगाराचं काय झालं?

सगळ्यात धक्कादायक म्हणजे याच अल्पवयीन आरोपीने निर्भयाच्या पार्श्वभागात लोखंडी रॉड घातला होता. अल्पवयीन गुन्हेगार म्हणून juvenile कोर्टात त्याला 3 वर्षाची शिक्षा झाली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मार्च : दिल्लीसह संपूर्ण देश हादरवणाऱ्या निर्भया बलात्कार खून प्रकरणी अखेर सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. Nirbhaya Gangrape Case प्रकरणातील 4 दोषींना अखेर 20 मार्चला रोजी सकाळी 5.30 वाजता फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. पण या चौघांशिवाय आणखी एक नराधम या गुन्ह्यात दोषी ठरला होता. पण अल्पवयीन असल्याकारणाने त्याच्यावर स्वतंत्र कोर्टात खटला चालला. या गुन्हेगाराची सध्या काय अवस्था आहे?

आणखी दोन आरोपींचं काय झालं?

फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या मुकेशसिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर यांच्याव्यतिरिक्त या प्रकरणात आणखी 2 दोषी आहेत. यातील एका आरोपी राम सिंगने तुरुंगातच आत्महत्या केल्याचा संशय आहे. याशिवाय आणखी एक गुन्हेगारही होता. गुन्ह्याच्या वेळी तो अल्पवयीन होता. त्यावेळी त्याला जुवेनाईल (juvenile) न्यायालयाने त्याला 3 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली होती. नंतर तो मुक्त झाला.

या गुन्ह्यात सामील झालेल्या सहा आरोपींना पकडण्यात आले होते, त्यातील एका कार चालकाने रामसिंगने तुरुंगात आत्महत्या केली. त्याच वेळी, अल्पवयीन आरोपीला जुवेनाईल जस्टिस अंतर्गत शिक्षा झाली. बाल सुधारगृहात 3 वर्षं घालविल्यानंतर त्याची 20 डिसेंबर 2015 रोजी सुटका झाली. सहा दोषींच्या तपासानंतर असं मानले जातं की, या अल्पवयीन मुलानेच निर्भयाला आणि तिच्या मित्राला आवाज देऊन बसमध्ये बसण्यासाठी बोलविले होतं. ती एक स्कूल बस होती आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली बस नव्हती.

निर्भया बसमध्ये बसल्यानंतर त्यानेच आधी तिची छेड काढली आणि इतर साथीदारांना विनयभंग करण्यास आणि बलात्काराची हिंट दिली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे याच अल्पवयीन आरोपीने निर्भयाच्या पार्श्वभागामध्ये लोखंडी रॉड घातला होता. यामुळे झालेल्या इन्फेक्शनमुळे पीडितेचा मृत्यू झाला.

संबंधित - ज्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार झाला ती कुठे आहे? वाचा धक्कादायक सत्य

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन गुन्हेगार हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो वयाच्या 11 व्या वर्षी घराच्या बिकट परिस्थितीमुळे पळून गेला आणि दिल्लीला आला. येथील फुटपाथांवर दिवस घालवताना तो बसचालक रामसिंगला भेटला. तेव्हापासून त्यानं रामसिंगसाठी क्लिनर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मात्र, रामसिंगकडून त्याला काही खास पैसे मिळाले नाहीत आणि जवळजवळ 8000 रुपयांची थकबाकीदेखील आहे.

16 डिसेंबरच्या रात्री त्याच पैशासाठी तो रामसिंगकडे पोहोचला आणि तेथून घटनेला सुरुवात झाली. गुन्ह्याच्या वेळी तो 17 वर्ष 6 महिन्यांचा होता. याचा अर्थ प्रौढ होण्यासाठी फक्त 6 महिने कमी होते.

सध्या करतो आचाऱ्याचं काम

संपूर्ण देशभरात या गुन्हेगाराविरोधात इतका राग होता की, सुरक्षा गृहातही त्याला कडक सुरक्षेत ठेवण्यात आलं होतं. तथापि, त्या काळात एका एनजीओने त्यांचं मानसिक आरोग्य ठीक ठेवण्यासाठी खोलीत टीव्ही उपलब्ध करुन दिला होता. देखरेखीखाली शिवणकामाचे काम या अल्पवयीन मुलाने शिकले होते. नंतर त्याने स्वयंपाकाची आवड असल्याचं सांगितलं, ज्यामुळे त्याला स्वयंपाक करण्याचं काम देखील शिकवले गेले.

जेलमधून सुटल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या परवानगीने त्याला दक्षिण भारतातील एका जिल्ह्यात ठेवण्यात आलं होतं. लोकांचा अजूनही त्याच्यावर खूप राग आहे. म्हणूनच त्याचं नाव बदलून त्याला सुरक्षित ठेवण्यात आले. बदललेल्या नावाने तो एका रेस्टॉरंटमध्ये काम करतो. वेळोवेळी त्याचं काम करण्याचं ठिकाण बदललं जातं, जेणेकरून त्याची खरी ओळख कोणालाही कळू नये.

-------------------

अन्य बातम्या

'द वॉल'ने शिकवलं कोरोनाशी लढायचं कसं? सोशल मीडियावर पोस्ट VIRAL

वकिलाचा फाशी वाचवण्याचा खटाटोप; म्हणे त्यांना पाकिस्तान बॉर्डरवर पाठवा

First published: January 7, 2020, 8:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading