नवी दिल्ली, 2 मार्च : दिल्लीसह संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी अखेर फाशीची तारीख निश्चित झाली आहे. पटियाला न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार मंगळवारी फाशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. दोषी पवनकुमार गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आज बंद कॅमेरात पवनच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीनंतर पटियाला न्यायालयानं आज डेथ वॉरंटमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं म्हटलं आहे. दोषी पवनने आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज केला आहे.
2012 Delhi gangrape case: A Delhi Court dismisses the application of convict Pawan, seeking stay on his execution. pic.twitter.com/MHszpN2eD8
पवनने गुन्हा केला तेव्हा तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यापार्श्वभूमीवर त्याला फाशीची शिक्षा न देता जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. पवनचे वकील एपी सिंह यांनी क्युरेटिव्ह याचिका दाखल करीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा फेटाळण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी पवनने दाखल केलेल्या या याचिकेवर आज 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. चार दोषींपैकी पवन हा क्युरेटिव्ह याचिका करणारा शेवटचा गुन्हेगार आहे. फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी त्याची विनंती आहे.
दिल्ली कोर्टाने 17 फेब्रुवारीला चारही दोषींना 3 मार्चला एकत्रित फाशी द्यायचा निर्णय दिला. आतापर्यंत कोर्टाने या चौघांसाठी तीन वेळा डेथ वॉरंट जारी केलं. पहिल्या दोन वेळेला दोषींनी कायद्यानं ठोठावल्याने फाशीची तारीख पुढे ढकलावी लागली. आता तिसऱ्यांदा डेथ वॉरंट जारी झालं आहे. पण याहीवेळी फाशीच्या आधी दोन दोषींनी याचिका दाखल केल्या होत्या.