निर्भया प्रकरण Live : दोषी मुकेश सिंहचा तुरुंगात लैंगिक छळ, वकिलांचा धक्कादायक खुलासा

निर्भया प्रकरण Live : दोषी मुकेश सिंहचा तुरुंगात लैंगिक छळ, वकिलांचा धक्कादायक खुलासा

दया याचिका फेटाळण्यापूर्वीच दोषी मुकेश सिंह याला वेगळ्या तुरुंगात टाकण्यात आले होते. हे तुरुंगाच्या नियमांविरुद्ध आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जानेवारी : निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कोर्टात दोषीचे वकील अंजना प्रकाश यांनी सांगितले की, राष्ट्रपतींना मुकेश सिंहच्या फाशी रद्द करण्य़ासाठी जो दयेचा अर्ज दिला होता त्यात तुरुंगाच्या अधीक्षकांनी शेरा दिला नाही. जर तुरुंगाच्या अधीक्षकांना शेरा देण्याची गरज नव्हती तर तो कॉलम का देण्यात आला आहे. जर त्या याचिकेच कॉलम असेल तर त्यांना त्यांचे मत वा शेरा देणं अपेक्षित होतं. इतकचं नव्हे तर दोषीच्या वकिलांनी आरोप केला आहे की, तुरुंगात मुकेश सिंहचा लैंगिक छळ करण्यात आला आहे.

यापुढे ते असंही म्हणाले की दया याचिका फेटाळण्यापूर्वीच दोषी मुकेश सिंह याला वेगळ्या तुरुंगात टाकण्यात आले होते. हे तुरुंगाच्या नियमांविरुद्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाने ठरविल्यानुसार राष्ट्रपतींच्या निर्णयाला मेरिटवर आव्हान देता येऊ शकत नाही. मात्र तुरुंग प्रशासनाकडून नियमभंग केला जात आहे.

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींपैकी मुकेश कुमार सिंगने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याविरोधात त्याने दाखल केलेल्या याचिकेवर तात्काळ सुनावणीची मागणी केली होती. सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटलं की, जेव्हा एखाद्याला फाशी देण्यात येणार असेल तर त्याला प्राधान्य देण्यापेक्षा दुसरं काही गरजेचं असू शकत नाही.

2012 मध्ये निर्भयावर झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर देश हादरला होता. नराधमांनी बलात्कार केल्यानंतर तिला रस्त्यावर फेकून दिलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी निर्भयाचा मृत्यू झाला. यातील दोषी मुकेश कुमारची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 17 जानेवारीला फेटाळून लावली होती.

निर्भयाच्या चारही दोषींना एक फेब्रुवारीला फाशी दिली जाणार आहे. मुकेशच्या वतीने क्युरेटिव्ह पेटिशन दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दया याचिकाही फेटाळली गेली. याशिवाय पवनच्या वडिलांनी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पेटिशनवर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. पवनच्या वडिलांनी साक्षीदाराच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला होता.

दोषीच्या वडिलांनी याचिका फेटाळली

दिल्लीच्या न्यायालयात सोमवारी एक दोषी पवन गुप्ताचे वडील हिरालाला यांची याचिका फेटाळण्यात आली होती. हिरालाल यांनी कनिष्ठ न्यायालयात निर्भया प्रकरणातील एकमात्र साक्षीदाराविरोधात FIR दाखल केली होती, ज्याला कोर्टाने 6 जानेवारी रोजी फेटाळले. निर्भयाने आईने न्यायालयावर विश्वास व्यक्त केला की या प्रकरणातून सोडवण्यासाठी दोषींनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतील, असा विश्वास असल्याचे मत निर्भयाच्या आईने व्यक्त केले होते.

First published: January 28, 2020, 3:07 PM IST

ताज्या बातम्या