निर्भया गँगरेप प्रकरण: नराधमांना फासावर लटकवणार की दिलासा मिळणार, या दिवशी ठरणार

निर्भया गँगरेप प्रकरण: नराधमांना फासावर लटकवणार की दिलासा मिळणार, या दिवशी ठरणार

दिल्लीतील पतियाळा कोर्टाने डेथ वारंट काढल्यानंतर दोन दोषींनी सुप्रीम कोर्ट क्यूरेटिव्ह अर्थात फेरविचार याचिका दाखल केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली,11 जानेवारी: दिल्लीतील बहुचर्चित निर्भया गँगरेप (Nirbhaya Gangrape Case) प्रकरणातील 4 दोषींच्या फाशीचा मुहुर्त पतियाला हाऊस कोर्टाने निश्चित केला आहे. येत्या 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता चारही नराधमांना फासावर लटकावण्यात येणार आहे.

दिल्लीतील पतियाळा कोर्टाने डेथ वारंट काढल्यानंतर दोन दोषींनी सुप्रीम कोर्ट क्यूरेटिव्ह अर्थात फेरविचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आता 14 जानेवारीला सुनावणी होणार आहे. निर्भयाच्या दोषींना 22 जानेवारीला फाशी देण्यात येईल, की त्यांना काही दिवस दिलासा मिळेल, हे 14 जानेवारी समजणार आहे.

दोषी विनय शर्मा आणि मुकेश याने सुप्रीम कोर्टात क्यूरेटिव्ह याचिका दाखल केली होती. येत्या 14 जानेवारीला सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती एनव्ही रमना, अरुण मिश्रा, आरएफ नरीमन, आर बनुमथी आणि अशोक भूषण यांच्या न्यायपीठात ही सुनावणी होणार आहे.

काय प्रकरण आहे?

16 डिसेंबर 2012 च्या रात्रीचे आहे. चालत्या बसमध्ये एका 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थीनीवर 6 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. नराधम आरोपींनी माणुसकीच्या सर्व मर्यादा सोडून पीडितेवर अत्याचार केले होते. नंतर तिला मृत्यूच्या मार्गी फेकण्यात आले. काही दिवसांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या गुन्ह्यासाठी पवन, मुकेश, अक्षय आणि विनय यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच वेळी, मुख्य आरोपी रामसिंगने खटल्याच्या वेळीच तिहार तुरुंगात आत्महत्या केली, तर आणखी एका अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात 3 वर्षानंतर सोडण्यात आले.

काय म्हणाले होते निर्भयाचे आई-बाबा?

निर्भयाच्या आई-वडिलांचे म्हणणे होते की, 'निर्भयाबरोबर झालेल्या बलात्काराला 7 वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत, परंतु अद्याप दोषींना फाशी देण्यात आलेली नाही किंवा आम्हाला न्याय मिळाला नाही. अशा परिस्थितीत निर्भयाच्या आई-वडिलांनाही आशा आहे की 7 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीदरम्यान, माननीय न्यायालय चार दोषींना फाशी देण्याच्या मृत्यूची वॉरंट जारी करेल' अखेर आज कोर्टाने सगळ्यात मोठा निर्णय दिला आहे.

निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार दोषींना एकाच वेळी फाशी देण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीच्या तिहार जेलमध्ये फाशी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आधी एका-एकाला फाशी देण्यात येणार होती पण आता चारही आरोपींना एकाच वेळी फाशी देण्यात येणार आहे. तशा तयारीलाही सुरुवात करण्यात आली आहे.

तिहार जेल देशातील असं पहिलं कारागृह आहे, जिथे एकाच वेळी चार आरोपींना फाशी देण्यात येणार आहे. आतापर्यंत इथे फक्त फाशी देण्याकरिता एकच जागा होती, परंतु आता त्यांची संख्या 4 करण्यात आली आहे. तिहार कारागृहाच्या आत फ्रेम्स तयार करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) सोमवारी पूर्ण केलं. हे काम पूर्ण करण्यासाठी जेलमध्ये जेसीबी मशीनदेखील आणण्यात आलं होतं. असं तिहार जेलच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: delhi news
First Published: Jan 11, 2020 02:20 PM IST

ताज्या बातम्या