निर्भया गॅंगरेप: नराधम मुकेश कुमारची दया याचिका फेटाळली, आता फाशी अटळ!

निर्भया गॅंगरेप: नराधम मुकेश कुमारची दया याचिका फेटाळली, आता फाशी अटळ!

माझ्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण करु नका, निर्भयाच्या आईचे अश्रु अनावर

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जानेवारी :  दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी काल गुरुवारी निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील गुन्हेगार मुकेश कुमार यांचा दयेचा अर्ज फेटाळला होता. हा अर्ज काल राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला होता. आताच हाती आलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती रामनाथ  कोविंद यांनी दोषी मुकेश कुमारचा दयेचा अर्ज फेटाळून लावला आहे. मात्र अद्याप चारही गुन्हेगारांना फाशी कधी होणार? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोषी मुकेश कुमार याला 22 जानेवारी रोजी फाशी दिली जाण्याची शक्यता आहे.

काय म्हणाली निर्भयाची आई

निर्भयावर अत्यंत क्रुर पद्धतीने अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात आली. मात्र नियमांमुळे ही तारीख पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने निर्भयाची आई अस्वस्थ आहे. आज एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना तिचे अश्रु अनावर झाले. याशिवाय निर्भया प्रकरणामुळे गुरुवारी भाजपा आणि आम आदमी पक्षामधील आरोप-प्रत्यारोप पाहून निर्भयाची आई अत्यंत दु:खी झाली. माझ्या मुलीवरील अत्याचार आणि मृत्यूचे राजकारण करु नका, अशी विनंती तिने यावेळी केली.

निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी लांबणीवर

सगळ्या देशाला प्रतिक्षा असलेल्या निर्भया प्रकरणातल्या दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या आरोपींना 22 तारखेला फाशी देणं शक्य नाही असं दिल्ली सरकारने म्हटलं आहे. मुकेश या दोषीने दयेची याचिका दाखल केल्याने ठरविलेल्या  तारखेला फाशी देणं शक्य नाही. या प्रकरणात चार आरोपींना सुप्रीम कोर्टानं दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र ही फाशी लांबणीवर टाकण्यासाठी आरोपी आपले सर्व उपाय अवलंबत आहे. फाशीची शिक्षा माफ व्हावी म्हणून आरोपींना राष्ट्रपतींकडे दयेची याचिका करण्याचा अधिकार आहे. आणि ही याचिका फेटाळल्यानंतरच शिक्षेवर अंमलबजावणी करता येते. या आधीच्या अनेक घटनांमध्ये राष्ट्रपतींनी दयेच्या याचिका फेटाळल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2020 01:18 PM IST

ताज्या बातम्या