निर्भया प्रकरणी फाशी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न, चौथ्या आरोपीची पुनर्विचार याचिका

निर्भया प्रकरणी फाशी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न, चौथ्या आरोपीची पुनर्विचार याचिका

हैदराबाद प्रकरणानंतर निर्भया प्रकरणातल्या आरोपींना केव्हाही फाशी होऊ शकते असंही बोललं जात होतं त्यामुळेच ही याचिका दाखल करण्यात आल्याचं बोललं जातंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातला (Nirbhaya Gangrape Case) एक आरोपी अक्षय कुमार सिंह याने सुप्रीम कोर्टात (Supreme court) फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केलीय. या आधी या प्रकरणातल्या विनय, पवन आणि मुकेश या आरोपींनी अशाच प्रकारची याचिका हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र कोर्टाने त्या सर्व याचिका फेटाळून लावत फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं होतं. केवळ फाशीच्या शिक्षेच्या अंलबजावणीला विलंब व्हावा यासाठीच ही याचिका दाखल करण्यात आल्याचं बोललं जातंय. हैदराबाद बलात्कार प्रकरणानंतर देशभर प्रचंड असंतोष निर्माण झालाय. त्यानंतर एन्काउंटर प्रकरण झालं. त्यामुळे वेगळं वादळ निर्माण झालंय. बलात्कारासारख्या अत्यंत घृणास्पद प्रकरणातल्या आरोपींच्या शिक्षेवर वर्षानुवर्ष अंमलबजावणी होत नसल्यामुळेही राग व्यक्त करण्यात येत होता.

'भारताचा प्रवास 'मेक इन इंडिया' पासून 'रेप इन इंडिया'पर्यंत'

डिसेंबर 2012मध्ये निर्भया प्रकरण झाल्यानंतर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. देशात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. मात्र आरोपींना शिक्षा होऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे प्रचंड टीका होत आहे. हैदराबाद प्रकरणानंतर निर्भया प्रकरणातल्या आरोपींना केव्हाही फाशी होऊ शकते असंही बोललं जात होतं त्यामुळेच ही याचिका दाखल करण्यात आल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, निर्भया सामूहिक बलात्कार (Nirbhaya Case) प्रकरणी दोषींपैकी एकाला मंडावलीहून तिहार कारागृहात हलविण्यात आले आहे. जिथे इतर गुन्हेगार तुरुंगवास भोगत आहेत. निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांचा माफीचा अर्ज नाकारल्यानंतर सर्व दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसेंना भेटणारच, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने भाजपची चिंता वाढली

16 डिसेंबरला आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यासाठी डमी ट्रायलही करण्यात आलं आहे. मात्र, आरोपींना फाशी देण्याचे अद्याप जेल प्रशासनाकडे पत्र आलेले नाही.

सात वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयासोबत चालत्या बसमध्ये सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. दोषी ठरविण्यात आलेल्या सहा अल्पवयीन मुलांपैकी एकाला आता सोडून देण्यात आलं. त्याचवेळी तिहारमध्येच एका आरोपी रामसिंगने आत्महत्या केली. उर्वरित चार दोषींना लवकरच फाशी देण्यात येईल. सूत्रांनी सांगितले की, तिहार जेल प्रशासनाने डमीमध्ये 100 किलो वाळू भरून चाचणी घेतली. याचा हेतू असा होता की, जर दोषींना फाशी देण्यात आली तर लटकवलेली विशेष दोरी त्यांच्या वजनाने तुटेल का?

इतर बातम्या - BREAKING: आज पहाटे ठाणे हादरलं, कचऱ्यात सापडले नवजात अर्भक

फाशी देण्यासाठी जो दोर दोरखंड लागतो तो करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीचा वापर करावा लागतो. देशात अतिशय मोजक्याच ठिकाणी हा दोरखंड तयार केला जातो. बिहारच्या बक्सर कारागृहात यासाठी दोरखंड तयार करण्याचं काम सुरू आहे. फाशीला लागणारे 10 दोरखंड तयार करण्याची ऑर्डर या कारागृहाला मिळाली आहे. त्याचा वापर निर्भया प्रकरणातल्या आरोपींना फाशी देण्यासाठी केला जावू शकतो अशी शक्यता व्यक्त केलीय जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2019 04:12 PM IST

ताज्या बातम्या