Home /News /national /

निर्भयाच्या आईने केलं कंगनाचं समर्थन, म्हणाली मला महान व्हायचं नाहीये!

निर्भयाच्या आईने केलं कंगनाचं समर्थन, म्हणाली मला महान व्हायचं नाहीये!

काही दिवसांपूर्वी वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी माफ करण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं

    नवी दिल्ली, 23 जानेवारी : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषींची फाशी यावरुन मतभेद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी माफ करण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईकडे अपील केलं होतं की, सोनिया गांधींनी जसं राजीव गांधीच्या मारेकऱ्यांना माफ केलं होतं तसं या आरोपींनाही माफ करायला हवं. त्यांच्या या वक्तव्यावरुन देशभरात संतापाची लाट उसळली होती. याबद्दलच इंदिरा यांच्या अपीलावर कंगनाला तिचं मत विचारण्यात आलं. यावर कंगनाने नाराजी व्यक्त केली, ‘अशा महिलांनाच या बलात्काऱ्यांसोबत 4 दिवस जेलमध्ये ठेवायला हवं. त्यानंतर त्यांना याची जाणीव होईल. इंदिरा जयसिंह सारख्या महिलांच्या पोटीच असे बलात्कारी जन्म घेतात. खरं तर या दोषीना भरचौकात फाशी द्यायला हवी, असंही ती यावेळी म्हणाली. यानंतर निर्भयाच्या आईने कंगनाचं समर्थन केलं आहे. मी आई आहे, पण मला महान व्हायचं नाहीये, अशा शब्दात त्यांनी इंदिरा जयसिंहवरील राग व्य़क्त केला. जयसिहं यांच्याकडे इशारा करत निर्भयाच्या आई म्हणाल्या, हे लोक Human Rightsच्या नावावर फक्त व्यवसाय करतात. आणि गुन्हेगारांचा बचाव करतात. बेधडक स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत तिचा आगामी सिनेमा ‘पंगा’च्या प्रमोशनदरम्यान पत्रकार परिषदेत कंगना राणौतला निर्भया गँगरेप प्रकरणातील आरोपींसाठी वकील इंदिरा जयसिंह यांच्या अपीलवर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना कंगनानं इंदिरा जयसिंह यांच्यावर थेट निशाणा साधत आपला राग व्यक्त केला. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींपैकी पवन गुप्ता याच्यावतीने अल्पवयीन असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. 1 फेब्रुवारी रोजी चारही दोषींना फाशी देण्यात येणार आहे. मात्र इतर तिघांनी
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Kangana ranaut, Nirbhaya gang rape case

    पुढील बातम्या