निर्भया प्रकरण : नराधमांची आज सुप्रीम कोर्टात शेवटची सुनावणी, 1 फेब्रुवारीला फाशी?

निर्भया प्रकरण : नराधमांची आज सुप्रीम कोर्टात शेवटची सुनावणी, 1 फेब्रुवारीला फाशी?

1 फेब्रुवारी रोजी फाशी द्यावयाची असल्यास याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची गरज आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जानेवारी : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंग याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मुकेशने दया याचिका फेटाळण्यावर आव्हान दिलं आहे. सोमवारी सकाळीच मुकेशच्या याचिकेवर सुनावणी करण्याची मागणी चीफ जस्टिस एस.ए बोबडे यांच्या अध्यक्षतेतील तीन सदस्यीय खंडपीठाने केली होती. 1 फेब्रुवारी रोजी फाशी द्यावयाची असल्यास याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची गरज आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 17 जानेवारी रोजी मुकेशची दया याचिका फेटाळाली होती. शनिवारी मुकेशने फाशीची शिक्षा आजीवान कारावासात करावी, अशी मागणी केली आहे. पातियाळा हाऊस कोर्टाने चारही दोषींना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फाशीवर लटकवण्याचा डेथ वॉरंट जारी करण्यात आला आहे. मुकेश आणि अक्षयने पुनर्विचार याचिका दाखल केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली. मात्र पवन गुप्ता आणि विनय शर्मा यांनी अद्याप पुनर्विचार याचिका दाखल केली नाही.

दोषीच्या वडिलांनी याचिका फेटाळली

दिल्लीच्या न्यायालयात सोमवारी एक दोषी पवन गुप्ताचे वडील हिरालाला यांची याचिका फेटाळण्यात आली. हिरालाल यांनी कनिष्ठ न्यायालयात निर्भया प्रकरणातील एकमात्र साक्षीदाराविरोधात FIR दाखल केली होती, ज्याला कोर्टाने 6 जानेवारी रोजी फेटाळले. निर्भयाने आईने न्यायालयावर विश्वास व्यक्त केला आहे. या प्रकरणातून सोडवण्यासाठी दोषींनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतील, असा विश्वास असल्याचे मत निर्भयाच्या आईने व्यक्त केले.

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवनच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका पाटियाला हाउस कोर्टच्या सेशन कोर्टाने फेटाळून लावली आहे. 6 जानेवारीला मेट्रोपोलिटियन मॅजिस्ट्रेटने पवनच्या वडिलांची याचिका फेटाळली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की, या प्रकरणामध्ये एकमेव साक्षीदाराने माध्यमांकडून पैसे घेऊन साक्ष दिली होती. यामुळे त्याची साक्ष सत्य आहे म्हणता येणार नाही. पवनशिवाय या प्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंगनेसुद्धा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याविरोधात त्याने दाखल केलेल्या याचिकेवर तात्काळ सुनावणीची मागणी केली होती. सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटलं की, जेव्हा एखाद्याला फाशी देण्यात येणार असेल तर त्याला प्राधान्य देण्यापेक्षा दुसरं काही गरजेचं असू शकत नाही. 2012 मध्ये निर्भयावर झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर देश हादरला होता. नराधमांनी बलात्कार केल्यानंतर तिला रस्त्यावर फेकून दिलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी निर्भयाचा मृत्यू झाला. यातील दोषी मुकेश कुमारची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 17 जानेवारीला फेटाळून लावली होती.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2020 09:19 AM IST

ताज्या बातम्या