Home /News /national /

फाशी टाळण्यासाठी 'निर्भया'चे आरोपी जेलमध्ये रचत आहेत कट

फाशी टाळण्यासाठी 'निर्भया'चे आरोपी जेलमध्ये रचत आहेत कट

आरोपी जेलमध्ये गुन्हेगारी कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय.

    नवी दिल्ली, 5 जानेवारी : निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील (nirbhaya case) आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. 7 जानेवारीला या प्रकरणातील आरोपींच्या फाशीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र ही फाशी टाळण्यासाठी आरोपी जेलमध्ये कट रचत असल्याचं जेल प्रशासनाकडून येणाऱ्या बातम्यांच्या आधारे स्पष्ट होत आहे. हे आरोपी जेलमध्ये गुन्हेगारी कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. फाशीची तारीख टाळता यावी यासाठी या गुन्हेगारांच्या हालचाली सुरू आहेत. जेलमध्ये गुन्हेगारी कृत्य करून त्याद्वारे पुन्हा नव्या केसमध्ये वेळ घालवण्याचा या गुन्हेगारांचा डाव असल्याची माहिती आहे. कारण जोपर्यंत नव्या गुन्ह्याची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना फाशी देता येणार नाही. या पार्श्वभूमीवर आता तिहार जेल प्रशासन अलर्ट झालं आहे. तिहार प्रशासलानाला जेल नंबर 2 मध्ये असलेले आरोपी अक्षय, मुकेश आणि पवन यांच्या इराद्यांबद्दल कुणकुण लागली आहे. त्यामुळे जेल नंबर 2 च्या अधीक्षकांनी मुख्यालयाला पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे, असं बोललं जात आहे. तसंच या तिन्ही आरोपांना हाय-सिक्योरिटी जेलमध्ये हलवण्यासाठी परवानगीही मागण्यात आली आहे. पार्टी करून आलेल्या महिलेला कारच्या आरशातून पाहिलं, ड्रायव्हरने तिच्याच फ्लॅटमध्ये केला बलात्कार 'निर्भया बलात्कार प्रकरणातील अक्षय, मुकेश आणि पवन हे आरोपी वाद घालून एकमेकांना इजा पोहचवू शकतात किंवा इतर कैद्यांवरही हल्ला करू शकतात. त्यामुळे त्यांना वेगवेगळं ठेवण्यात यावं,' अशी मागणी अधीक्षकांनी केल्याचं कळतंय. दरम्यान, निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार दोषींना एकाच वेळी फाशी देण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीच्या तिहार जेलमध्ये फाशी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आधी एका-एकाला फाशी देण्यात येणार होती पण आता चारही आरोपींना एकाच वेळी फाशी देण्यात येणार आहे. तशा तयारीलाही सुरुवात करण्यात आली आहे. बापरे...थंड नाश्ता दिला म्हणून सासऱ्याने केली सुनेची गोळी झाडून हत्या तिहार जेल देशातील असं पहिलं कारागृह आहे, जिथे एकाच वेळी चार आरोपींना फाशी देण्यात येणार आहे. आतापर्यंत इथे फक्त फाशी देण्याकरिता एकच जागा होती, परंतु आता त्यांची संख्या 4 करण्यात आली आहे. तिहार कारागृहाच्या आत फ्रेम्स तयार करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) सोमवारी पूर्ण केलं. हे काम पूर्ण करण्यासाठी जेलमध्ये जेसीबी मशीनदेखील आणण्यात आलं होतं. असं तिहार जेलच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Nirbhaya gang rape case, Nirbhaya rape and murder case

    पुढील बातम्या