Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /देश /

दिल्ली निर्भया प्रकरण: नराधमांच्या नातेवाईकांनी राष्ट्रपतींकडे मागितलं इच्छामरण!

दिल्ली निर्भया प्रकरण: नराधमांच्या नातेवाईकांनी राष्ट्रपतींकडे मागितलं इच्छामरण!

दिल्लीतील निर्भया गँगरेप (Nirbhaya Gangrape) प्रकरणाला आला नवं वळण लागलं आहे.

दिल्लीतील निर्भया गँगरेप (Nirbhaya Gangrape) प्रकरणाला आला नवं वळण लागलं आहे.

दिल्लीतील निर्भया गँगरेप (Nirbhaya Gangrape) प्रकरणाला आला नवं वळण लागलं आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

नवी दिल्ली,16 मार्च:दिल्लीतील निर्भया गँगरेप (Nirbhaya Gangrape) प्रकरणाला आला नवं वळण लागलं आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या चारही दोषींच्या नातेवाईकांनी आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी पत्र लिहून इच्छामरणाची (euthanasia) परवानगी मागितली आहे. इच्छामरणाची मागणी करणाऱ्यांमध्ये दोषींचे वयोवृद्ध आई-वडील, भाऊ-बहीण आणि त्यांच्या मुलांचा समावेश आहे.

निर्भयाच्या दोषींनी राष्ट्रपतींना हिंदीत पत्र लिहिले आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि निर्भयाच्या आई-वडिलांना आम्ही विनंती करतो की, आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी. भविष्यातील बलात्काराच्या घटना आमच्या मृत्युने रोखले जाऊ शकतात. दोषींच्या नातेवाईकांना इच्छामरण दिल्यास निर्भया सारखी दुसरी घटना होणार नाही.

दोषींच्या नातेवाईकांनी सांगितलं की, असं कोणतंच पाप नाही के त्याला माफ केलं जाऊ शकत नाही. या आधी देशात अनेक महापापींनी माफ करण्यात आलं होतं. सूड घेण्याची व्याख्या म्हणजे शक्ती नाही. क्षमा करणे हीच मोठी शक्तीचं उदाहरण आहे.

हेही वाचा...MP त राजकीय नाट्य सुरुच, कोरोनाचं कारण पुढे विधानसभेचं कामकाज 26 मार्चपर्यंत स्थगित

राष्ट्रपतींनी सर्व दोषींची दया याचिका फेटाळली...

निर्भयाच्यार दोषींची दया याचिका राष्ट्रपती राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी आधीच फेटाळली आहे. दोषी अक्षय सिंह ठाकूर याने नवी दया याचिका दाखल केली आहे. दरम्यान, निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी सर्व दोषी विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेशला 20 मार्चला पहाटे पाच वाजता फालावर लटकावण्यात येणार आहे.

हेही वाचा...पुण्यात पहिला गुन्हा दाखल, कोरोनाची अफवा पसरवणं पडलं महागात

काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?

- सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता.

- सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते.

- त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला.

- यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले.

- तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं.

- दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

- मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.

First published:

Tags: Delhi rape, Delhi rape case, Nirbhaya gang rape case, Nirbhaya rape and murder case, President of india, President ramnath kovind