Home /News /national /

#BREAKING: फाशी पुन्हा लांबणीवर! निर्भयाचे गुन्हेगार पुढच्या आदेशापर्यंत फासावर नाहीत

#BREAKING: फाशी पुन्हा लांबणीवर! निर्भयाचे गुन्हेगार पुढच्या आदेशापर्यंत फासावर नाहीत

पवनने गुन्हा केला तेव्हा तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यापार्श्वभूमीवर त्याला फाशीची शिक्षा न देता जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 2 मार्च : दिल्लीसह देश हादरवणाऱ्या निर्भया गँगरेप प्रकरणात 4 गुन्हेगारांना उद्या म्हणजे 3 मार्चला फाशी देण्यात येणार होती. पण अखेरच्या क्षणी कोर्टाने या चौघांची फाशी थांबवण्याचे आदेश दिले. पटियाला न्यायालयाने पुढच्या आदेशापर्यंत निर्भयाच्या दोषींच्या फाशीला स्थगिती दिली आहे. पुढचे आदेश मिळत नाहीत तोवर आता ही फाशी होणार नाही. आतापर्यंत या चार गुन्हेगारांविरोधात तीन वेळा डेथ वॉरंट जारी करण्यात आलं होतं. तिन्ही वेळा फाशी पुढे ढकलण्यात आली. दोषी पवनकुमार गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका आज सकाळीच सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. बंद कॅमेरात पवनच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी झाली. पण आता दुसऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू असाना पतियाळा कोर्टाने फाशी तूर्त स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. 'फाशीची शिक्षा बदलून जन्मठेपेची शिक्षा द्यावी' पवनने गुन्हा केला तेव्हा तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यापार्श्वभूमीवर त्याला फाशीची शिक्षा न देता जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. पवनचे वकील एपी सिंह यांनी क्युरेटिव्ह याचिका दाखल करीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा फेटाळण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी पवनने दाखल केलेल्या या याचिकेवर आज 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. चार दोषींपैकी पवन हा क्युरेटिव्ह याचिका करणारा शेवटचा गुन्हेगार आहे. फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी त्याची विनंती होती. दिल्ली कोर्टाने 17 फेब्रुवारीला चारही दोषींना 3 मार्चला एकत्रित फाशी द्यायचा निर्णय दिला होता.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या