धक्कादायक! नराधमांच्या फाशीनंतर गूगलवर निर्भया बाबतीत शोधली जातेय 'ही' माहिती

धक्कादायक! नराधमांच्या फाशीनंतर गूगलवर निर्भया बाबतीत शोधली जातेय 'ही' माहिती

गेल्या 7 वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असेलेल्या निर्भयाला अखेर शुक्रवारी पहाटे न्याय मिळाला. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या चारही नराधमांना फासावर लटकवण्यात आलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मार्च : गेल्या 7 वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असेलेल्या निर्भयाला अखेर शुक्रवारी पहाटे न्याय मिळाला. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या चारही नराधमांना फासावर लटकवण्यात आलं. त्यानंतर सर्वत्र निर्भयाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. असं असलं तरीही इंटरनेटवर मात्र लोक वेगळंच सर्च करत आहेत. गुगल ट्रेंडमध्ये याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सात वर्षांपूर्वी देशाला हादरवून टाकणारी घटना दिल्लीत घडली होती. 2012 रोजी दिल्लीतील निर्भयावर क्रूरपणे बलात्कार करून हत्या करणाऱ्या पापी नराधमांचा अखेर अंत झाला आणि निर्भयाला उशिरा का होईना न्यायव्यवस्थेनं न्याय दिला. नराधमांनी 7 वर्षांमध्ये सर्व पळवाटांचा अवलंब करत फाशी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला मात्र सगळे प्रयत्न अपयशी ठरले. नराधमांना फाशी दिल्यानंतर तिहार जेलबाहेर नागरिकांनी तिरंगा फडकवून निर्भयाला न्याय दिल्याचं समाधान व्यक्त केलं.

एकीकडं न्याय मिळाल्याचं समाधान व्यक्त करताना बलात्काऱ्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मागणीही केली जात आहे. कारण निर्भयाच्या दोषींनी कायद्याच्या जवळपास सर्वच पळवाटांचा वापर करून फाशी लांबवण्याचा प्रयत्न केला. फाशीच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांचे यासाठी प्रयत्न सुरु होते. आता त्यांना फाशी झाली मात्र त्यानंतर इंटरनेटवर निर्भयाबद्दल धक्कादायक माहितीचा शोध घेतला जात आहे.

निर्भयाच्या दोषींच्या मृतदेहांचे फोटो, दोषींचे मृतदेह फासावर लटकत असलेले फोटो, दोषींच्या वकीलाची माहिती यासह निर्भयाच्या मृतदेहाचे फोटो आणि निर्भयाबद्दलची माहितीही लोक शोधत आहेत. गुगल सर्चमध्ये nirbhaya convicts dead body pics, nirbhaya convicts bodies, a p singh nirbhaya lawyer, nirbhaya convicts dead body, nirbhaya dead body, dead body of nirbhaya, dead body of nirbhaya convicts, nirbhaya real story, bodies of nirbhaya convicts, dead bodies of nirbhaya convicts असे किवर्ड टाकून निर्भयाबद्दलच्या माहितीचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, दोषींना फाशी दिल्यानंतर निर्भयाच्या आईने शेवटी न्याय मिळाला असं म्हटलं. ''आजचा दिवस निर्भायाचा आहे. संपूर्ण देश हा दिवस विसरणार नाही. उशिरा का होईना निर्भयाला अखेर न्याय मिळाला. त्यामुळे मी न्यायव्यवस्था आणि संविधानाचे आभार मानते. मी माझ्या मुलीला वाचवू शकले नाही पण न्याय देऊ शकले याचं समाधान आहे. नराधमांनी फाशी टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र न्यायव्यवस्थेनं त्यांना योग्य ती शिक्षा दिली. उशीर झाला खरा पण आजच्या या घटनेमुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास कायम राहिल'',अशा भावना निर्भयाच्या आईने दोषींना दिलेल्या फाशीनंतर व्यक्त केल्या.

हे वाचा : निर्भयाला न्याय देण्यासाठी ढाल बनून उभ्या असलेल्या सीमा समृद्धी कोण आहेत?

First published: March 20, 2020, 5:52 PM IST
Tags: nirbhaya

ताज्या बातम्या