नवी दिल्ली, 27 जानेवारी : निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींपैकी मुकेश कुमार सिंगने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याविरोधात त्याने दाखल केलेल्या याचिकेवर तात्काळ सुनावणीची मागणी केली होती. सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटलं की, जेव्हा एखाद्याला फाशी देण्यात येणार असेल तर त्याला प्राधान्य देण्यापेक्षा दुसरं काही गरजेचं असू शकत नाही.
2012 मध्ये निर्भयावर झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर देश हादरला होता. नराधमांनी बलात्कार केल्यानंतर तिला रस्त्यावर फेकून दिलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी निर्भयाचा मृत्यू झाला. यातील दोषी मुकेश कुमारची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 17 जानेवारीला फेटाळून लावली होती.
सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या खंडपीठाने म्हटलं की, जर एखाद्याला फाशी दिली जाणार असेल तर यापेक्षा अधिक गरजेचं काही असू शकत नाही. मुकेश कुमारच्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सक्षम अधिकाऱ्याशी संपर्क करावा असंही सांगण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालय तात्काळ सुनावणी घेण्यास तयार असल्याने आता काय होणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
निर्भयाच्या चारही दोषींना एक फेब्रुवारीला फाशी दिली जाणार आहे. मुकेशच्या वतीने क्युरेटिव्ह पेटिशन दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दया याचिकाही फेटाळली गेली. याशिवाय पवनच्या वडिलांनी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पेटिशनवर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. पवनच्या वडिलांनी साक्षीदाराच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला होता.
निर्भया प्रकरण : दोषी विनयने तुरुंगात केलेल्या 11 पेंटिंग्सची विक्री मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.