निर्भयाच्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी वकिलाने दिला गांधी हत्येचा दाखला

निर्भयाच्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी वकिलाने दिला गांधी हत्येचा दाखला

फाशीची शिक्षा रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायलयात दाखल करण्यात आली होती. ही पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 डिसेंबर : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाती चार दोषींपैकी एक असलेल्या अक्षय ठाकुरच्या फाशीला रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायलयात दाखल करण्यात आली होती. ही पुनर्विचार याचिका फेटाळून लावण्यात आली. या सुनावणीवेळी दोषी अक्षयच्या वकीलांनी सत्ययुग ते त्रेतायुगाचे दाखले देत फाशी न देण्याची मागणी केली. दोषी अक्षयकडून वकील एपी सिंह यांनी युक्तीवाद केला. त्यांनी न्यायाधीश आर.भानुमति, न्यायाधीश अशोक बूषण, न्यायाधीश ए एस बोपन्न यांच्यासमोर सत्ययुग, त्रेतायुग यासह महात्मा गांधी, नथुराम गोडसे, दिल्ली प्रदूषण आणि मानवाधिकाराचे दाखले वकीलांनी दिले. मात्र, तिनही न्यायाधीशांनी वकीलांचा युक्तीवाद फेटाळून लावला.

एपी सिंह : पीडितेचा मित्र 2013 मध्ये माध्यमांकडून पैसे घेऊन खोटी माहिती देत होता. तेव्हा न्यायालयात खटला सुरु होता. त्यामुळे त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. आरोपींची ओळख परेड झाली त्यावरही प्रश्न निर्माण होत आहेत.

न्यायाधीश भानुमति : यावर आधीच बोलणं झालेलं आहे. तुम्ही चौकशीवर प्रश्न उपस्थित करू शकत नाही.

एपी सिंह : तिहारचे निवृत्त अधिकारी सुनील गुप्ता यांनी रामसिंगच्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातही आत्महत्येबाबत शंका व्यक्त करण्यात आली होती. रामसिंगच्या व्हिसेरामध्ये दारुचे अंश आढळले होते. त्याची चौकशी का झाली नाही.

-महात्मा गांधींची हत्या गोडसेनेच केली होती की नाही? यावर आजपर्यंत काही स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणात असं होऊ नये.

-या प्रकरणात राज्य सरकारने अतकी तत्परात का दाखवली? अनेक गंभीर प्रकरणे समोर आहे. यावरून हे फक्त राजकीय अजेंडा असल्याचं दिसतं.

-भारत हा अहिंसेचा पुरस्कार करणार देश आहे. सर्वे भवंतु सुखिनः या मंत्रावर तो चालतो. त्यामुळे फाशी देऊ नका.

-सत्ययुग, त्रेतायुग यांच्या तुलनेत तसेही आजच्या लोकांचे वय कमी झाले आहे. दिल्लीत प्रदुषणामुळे लोकांचे जीवनमान खालावले आहे.

-कमकुवत लोकांना मदत करण्याचे काम केले पाहिजे. फाशीची शिक्षा ही मानवाधिकाराचे उल्लंघन करणारी आहे.

-सीसीटीव्ही फुटेजमध्ये बस दिसली होती आणि त्यावर यादव असं लिहिलं होतं. याच्या आधारावर बसचा शोध घेतला गेला. पण बस पोलिस ठाण्यात आणण्याऐवजी त्यागराज स्टेडियममध्ये का नेली?

-पीडिता उपचारावेळी औषधांच्या गुंगीत होती. अशावेळी घेतलेली साक्ष कशी घेतली?

दिल्लीत 16 डिसेंबर 2012 मध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या करण्यात आली होती. यामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. दिल्ली न्यायालयाने या प्रकरणी मुकेश, पवन, विनय आणि अक्षय यांना दोषी ठरवलं होतं. तर एक आरोपी रामसिंगने तिहारच्या तुरुंगात फाशी घेऊन आत्महत्या केली होती. याशिवाय एक आरोपी अल्पवयीन असल्याने तीन वर्षांची शिक्षा भोगून सुटला आहे.

वाचा : निर्भया केस: सरन्यायाधीश बोबडेंनी या कारणांमुळे सुनावणीतून घेतली माघार

Published by: Suraj Yadav
First published: December 18, 2019, 2:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading