BREAKING : निर्भया प्रकरणी आरोपींची फाशी होणार रद्द? दया याचिकेच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष

BREAKING : निर्भया प्रकरणी आरोपींची फाशी होणार रद्द? दया याचिकेच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष

फाशीची शिक्षा आता पुढे जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आता 17 डिसेंबरला पुढची सुनावणी होणार आहे तर 18 डिसेंबरला पाटिलाया हाऊस कोर्टात सुनावणी होईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : देशभर गाजलेल्या निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातल्या दोषींना कधी फाशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीशकुमार अरोरा यांनी निर्भयाच्या आई-वडिलांच्या मृत्यू वॉरंट जारी करण्याच्या व सर्व दोषींच्या फाशीची मागणी करण्याच्या याचिकेवरील सुनावणी 18 डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळं फाशीची शिक्षा आता पुढे जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आता 17 डिसेंबरला पुढची सुनावणी होणार आहे तर 18 डिसेंबरला पाटिलाया हाऊस कोर्टात सुनावणी होईल.

2012मध्ये झालेल्या या प्रकरणाचे पडसाद देशभर उमटले होते. यातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र 7 वर्षानंतरही त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. हैदराबाद एन्काउंटर प्रकरण घडल्यानंतर देशभर प्रचंड असंतोष निर्माण झाला. आरोपींना शिक्षाच होत नसेल तर गुन्हेगारांवर वचक कसा बसणार असा सवाल विचारला जातोय. त्या पार्श्वभूमीवर निर्भया प्रकरणातल्या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाऊ शकते, मात्र आता याबाबात निर्णय हा 18 डिसेंबरनंतर घेतला जाईल.

याआधी या आरोपींपैकी तीन जणांनी राष्ट्रपतींकडे केलेली दयेची याचिका फेटाळून लावण्यात आली होती. त्यानंतर विनय शर्मा या चौथ्या आरोपीने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. हा अर्ज फेटाळून लावण्यात यावा अशी शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींकडे केली. याच प्रकरणाचा पुनर्विचार करावी असा अर्जही विनय शर्माने सुप्रीम कोर्टात केला होता त्यावर 17 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. त्यानंतर 18 तारखेला फाशीच्या शिक्षेवर सुनावणी होईल.

शिक्षेच्या अंमलबजावणीचं ट्रायलही झालं.

शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी डमी ट्रायलही करण्यात आलं आहे. मात्र, आरोपींना फाशी देण्याचे अद्याप जेल प्रशासनाकडे पत्र आलेले नाही. निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावलेल्या तिहारमधील दोषींची दया याचिका फेटाळण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2019 11:00 AM IST

ताज्या बातम्या