मराठी बातम्या /बातम्या /देश /

आजच्या दिवशी ज्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार झाला ती कुठे आहे?

आजच्या दिवशी ज्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार झाला ती कुठे आहे?

निर्भया घटनेतील आरोपींना शिक्षा करण्यात या बसची महत्त्वपूर्ण भूमिका होती. ती आता कुठे आहे आणि कोणत्या स्थितीत आहे?

निर्भया घटनेतील आरोपींना शिक्षा करण्यात या बसची महत्त्वपूर्ण भूमिका होती. ती आता कुठे आहे आणि कोणत्या स्थितीत आहे?

निर्भया घटनेतील आरोपींना शिक्षा करण्यात या बसची महत्त्वपूर्ण भूमिका होती. ती आता कुठे आहे आणि कोणत्या स्थितीत आहे?

  • Published by:  Renuka Dhaybar
नवी दिल्ली, 16 डिसेंबर : 16 डिसेंबर 2012 रोजी रात्री दिल्लीच्या रस्त्यांवर धावत्या बसमध्ये निर्भया नावाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. तीच बस आणि त्यातील सापडलेले पुरावे नंतर तपासादरम्यान या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असल्याचे सिद्ध झाले. निर्भया घटनेतील आरोपींना शिक्षा करण्यात या बसची महत्त्वपूर्ण भूमिका होती. आज निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्याच्या चर्चा चालू असताना न्यूज 18 तुम्हाला त्या बसची संपूर्ण कहानी सांगणार आहोत. ती आता कुठे आहे आणि कोणत्या स्थितीत आहे? खरंतर, देशातील हादरून गेलेल्या घटनेचा महत्त्वपूर्ण दुवा असणारी ही बस दिल्लीच्या सागरपूर भागात भंगाराच्या अवस्थेत उभी आहे. काय झाले होते त्या रात्री? 16 डिसेंबरच्या रात्री, ही पांढरी बस क्रमांक 0149 नेहमीप्रमाणे रविदास कँपमध्ये उभी होती. तेव्हा बसचा मुख्य ड्रायव्हर रामसिंग काही खुरापती करण्याचा प्लान आखतो. त्याच्यासमवेत मुकेश, अक्षय, पवन, विनय आणि एक अल्पवयीन तरुण होते. रविदाससह सगळे जण कॅम्प आरके पुरम येथून बस घेऊन निघतात. आरके पुरममध्ये बसमध्ये सीएनजी भरतात. त्यानंतर अफ्रीका एव्हेन्यू मार्गे, बस आयआयटी फ्लायओव्हर पोलीस कॉलनीमध्ये येते. तिथे एक व्यक्ती बस थांबवतो आणि त्यामध्ये चढतो. त्यानंतर आरोपींनी त्याला लुटले आणि बसमधून खाली फेकले. यावेळी, बस हौजखास गोल्डन ड्रॅगन रेस्टॉरंटच्या रेड लाइटपासून यू टर्न घेते आणि मुनिरका बस स्टँडवर पोहोचते. इतर बातम्या - आरोपींच्या फाशीच्या मागणीसाठी उपोषणावर बसलल्या स्वाती मालीवाल बेशुद्ध निर्भया आणि मित्र बसमध्ये चढतो निर्भया आणि तिचा मित्र मुनिरका बसस्थानकाजवळ उभे होते. तेव्हा बसमधील अल्पवयीन मुलगा 'पालम, नजफगड, द्वारका' असा आवाज देतो. मुलगी आणि तिचा मित्र पालमला जाण्यासाठी बसमध्ये चढतात. ड्रायव्हर बसमध्ये केविन होता आणि ड्रायव्हिंग सीटवर भगवान शिवची मूर्ती ठेवण्यात आली होती. बसमध्ये पडदे लावण्यात आले होते. निर्भया आणि तिचा मित्र बसच्या डाव्या बाजूला कंडक्टरच्या सीटच्या मागे दुसर्‍या ओळीच्या सीटवर बसले होते. पैसे घेताना एका आरोपीने निर्भयाकडे वाईट नजर टाकली. जेव्हा निर्भयाच्या मित्राने विरोध केला तेव्हा सर्वांनी त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. निर्भयाचा मित्र बस सीटच्या खाली लपला होता. त्यानंतर, सर्व आरोपींनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. यावेळी, बस महिपालपूरहून यूटर्न घेत पालम उड्डाणपुलामार्गे रंगपूरीकडे जाण्यासाठी निघाली असता, महिपालपूर परिसरातील आरोपीने मुलगी आणि तिच्या मित्राला खाली फेकले. यानंतर आरोपींनी दोघांवरही बसमध्ये चढण्याचाही प्रयत्न केला. गुन्हा केल्यावर सर्व आरोपी बस घेऊन रविदास कँपमध्ये गेले, तिथे सर्वानी आपले कपडे आणि निर्भया व तिच्या मित्राचे कपडे जाळले. उर्वरित कपडे जमिनीत दफन करुन बस धुतली, जेणेकरून कोणताही पुरावा राहू नये. तपासातल्या महत्त्वाच्या 3 गोष्टी घटनेनंतर पोलिसांना माहिती मिळताच तपासादरम्यान, प्रथम 3 महत्त्वाच्या गोष्टी उघडकीस आल्या. पहिली पांढऱ्या रंगाची बस, दुसरं बसवर 'यादव' लिहिलेले होते आणि तिसरं बसमध्ये ड्रायव्हिंग सीटवर शिवची मूर्ती होती. घटनेनंतर आरोपींनी मूर्ती बसमधून काढून टाकली होती. सीसीटीव्हीवरून काही पुरावे सापडले होते, परंतु बसचा नंबर सापडला नाही. या प्रकरणाशी संबंधित तत्कालीन कोटला मुबारकपुर पोलीस स्टेशनचे SHO नरेश सोलंकी यांना महत्त्वाची लीड मिळाली. पालम भागातील एका मुखबाराने सांगितले की, यादव ट्रॅव्हल्सची एक बस दररोज रात्री आर के पुरम रविदास कॅम्प येथे उभी असते. घटनेच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजेच 17 डिसेंबर रोजी नरेश सोलंकी, पोलीस निरीक्षक वेदप्रकाश आणि आयओ प्रतिभा आणि या प्रकरणातील उर्वरित कर्मचार्‍यांनी आरोपी रामसिंगला रविदास कँपमधून सायंकाळी 4 वाजता अटक केली. त्यावेळी या प्रकरणात बस सापडली. पण आता मात्र याबसची अवस्था झाली आहे. या प्रकरणाती पहिली अटक म्हणजे बस आणि बस चालक रविदास होता. यानंतर पोलीस निरीक्षक वेदप्रकाश पुढील तपासासाठी बस आणि आरोपीला घेऊन त्यागराज स्टेडियम पोहोचले. बसमध्ये निर्भयाचे केस, तिच्या शरीराच्या त्वचेचे काही भाग आणि रक्त पोलिसांनी पुरावा म्हणून मिळाले. ज्या लोखंडी रॉडने निर्भयाला मारलं गेलं तीसुद्धा पोलिसांना मिळाली. बसच्या सीटावर रक्ताचे डाग दिसले. खरंतर बस AT Ambit कंपनीसाठी चार्टर्ड बसचं काम करायची. सकाळी 7 वाजता मुलांना शाळेत सोडण्याचं आणि सकाळी 9 वाजता रोज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आरके पुरममधून नोएडा सोडण्यासाठी जायची. दुपारी 1 वाजताच्या सुमारास पुन्हा बस मुलांना शाळेतून घरी सोडायची आणि संध्याकाळी 6 वाजता कर्मचाऱ्यांना पुन्हा आरके पुरम इथे सोडायची. पण सध्या ही बस भंगार अवस्थेमध्ये दिल्लीच्या सागरपूर परिसरात उभी आहे.
First published:

Tags: Nirbhaya gang rape case

पुढील बातम्या