आता फक्त नीरव मोदीच्या आंतरराष्ट्रीय पकड वॉरंटची प्रतिक्षा !

आता फक्त नीरव मोदीच्या आंतरराष्ट्रीय पकड वॉरंटची प्रतिक्षा !

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीच्या आंतरराष्ट्रीय पकड वॉरंटची भारतीय तपास यंत्रणा वाट पाहत आहेत.

  • Share this:

19 एप्रिल : पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीच्या आंतरराष्ट्रीय पकड वॉरंटची भारतीय तपास यंत्रणा वाट पाहत आहेत. दरम्यान, इंटरपोलनं भारतीय तपास यंत्रणांना नीरव मोदीला रेड कॉर्नर नोटीस बजावण्यापूर्वी एक प्रश्नावली तपास यंत्रणांना पाठवली असून त्यात ८ प्रश्न विचारले आहेत.

फ्रान्समधील ल्योन येथे असलेल्या इंटरपोलच्या मुख्यालयाकडून त्यांच्या भारतातील दिल्लीच्या कार्यालयाकडे ही प्रश्नावली पाठवण्यात आली आहे. याद्वारे त्यांनी नीरव मोदीबाबत काही महत्वाची माहिती विचारली आहे. या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात जर भारतीय तपास यंत्रणा कुचकामी ठरल्या तर नीरव मोदींविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्यास अवघड होऊ शकते.

इंटरपोलच्या दिल्लीतील नॅशनल सेन्ट्रल ब्युरोने ही प्रश्नावली सीबीआय, ईडी आणि फ्रॉड इनव्हेस्टिगेशन ऑफिसकडे (एसएफआयओ) पाठवली असून या भारतीय तपास यंत्रणा या प्रश्नांना योग्य प्रतिसाद देण्यासाठी रात्रीपासून कामाला लागल्या आहेत.

 

First published: April 19, 2018, 8:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading