शिक्षेपासून सुटका व्हावी म्हणून नीरव मोदीनं खेळली नवीन चाल

शिक्षेपासून सुटका व्हावी म्हणून नीरव मोदीनं खेळली नवीन चाल

नीरव मोदी शिक्षेपासून सुटण्याकरता आता नवीन नवीन शक्कल लढवत आहे.

  • Share this:

लंडन, 17 जून : पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावल्यानंतर नीरव मोदी सध्या वेस्टमिन्ट्सरमध्ये शिक्षा भोगत आहे. त्याचा प्रत्यार्पणासाठी देखील भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. आता शिक्षेपासून सुटका व्हावी यासाठी नीरव मोदीनं नवीन चाल खेळली आहे. नीरव मोदीच्या वकिलानं नीरव मोदीविरोधात भ्रष्टाचार निर्मूलनांतर्गत सुनावणी होऊ शकत नाही असं म्हटलं आहे. मुंबईत या प्रकरणाची सुनावणी होणार होती. दरम्यान, वकिलाच्या युक्तिवादामुळे सुनावणी 25 जून पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. भारतातील पंजाब महाराष्ट्र बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावल्यानंतर नीरव मोदी परदेशी पसार झाला. त्यानंतर त्यानं अनेक देशांमध्ये आश्रय देखील घेतला. पण, त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. नीरव मोदीनं केलेला घोटाळा हा देशाच्या बँकींग क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा ठरला.

उद्धव ठाकरे का करत आहेत वारंवार अयोध्या दौरा?

मामा – भाचानं लावला चुना

पंजाब महाराष्ट्र बँकेला नीरव मोदी आणि मामा मेहुल चोक्सी यांनी 13 हजार कोटींचा चुना लावला. या प्रकरणात पंजाब महाराष्ट्र बँकेच्या काही कर्मचाऱ्यांना देखील अटक करण्यात आली. नीरव मोदीचा पासपोर्ट देखील रद्द करण्यात आला. सध्या त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत.

संपत्ती जप्त

दरम्यान, ईडीनं नीरव मोदीची संपत्ती जप्त करायला देखील सुरूवात केली. शिवाय, त्याचा अलिबागमधील अलिशान बंगला देखील पाडला. त्याच्या विरोधात भारतीय यंत्रणा आता कठोर पावलं उचलताना दिसत आहेत. देशात देखील नीरव मोदीला भारतात परत आणा अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. दुसरीकडे विजय माल्ल्या देखील सध्या लंडनमध्येच वास्तव्याला आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी देखील जोरदार प्रयत्न भारताकडून होताना दिसत आहे.

VIDEO: पराभवामुळे विरोधकांचं मानसिक संतुलन ढासळलं - पंकजा मुंडे

First published: June 17, 2019, 3:05 PM IST
Tags: nirav modi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading