नीरव मोदी पुन्हा दिसला लंडनच्या रस्त्यावर

नीरव मोदी पुन्हा दिसला लंडनच्या रस्त्यावर

लंडनच्या कोर्टाने नीरव मोदीच्या विरोधात अखेर अटक वॉरंट जारी केलं आहे.

  • Share this:

लंडन, 19 मार्च : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी पुन्हा एकदा लंडनमधील रस्त्यावर दिसला. त्याला न्यूज 18 ने प्रश्न विचारले मात्र त्याने यावर मौन बाळगले. सोमवारी त्याच्या अटकेचे वॉरंट वेस्टमिंस्टर न्यायालयाने जारी केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला कधीही अटक केली जाऊ शकते.

मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यार्पण केले जावे यासाठी विनंती करण्यात आली होती. यावर निर्णय देताना न्यायालयाने नीरव मोदीला अटक करण्याचे आदेश दिले होते.

न्यूज 18 ने लंडनमध्ये नीरव मोदीला अनेक प्रश्न विचारले मात्र कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास त्याने नकार दिली. आतापर्यंत दुसऱ्यांदा तो लंडनमध्ये दिसला आहे.

दरम्यान, भारतीय बँकिंग क्षेत्रात सर्वात 13 हजार कोटींचा घोटाळा केल्यानंतर नीरव मोदी वर्षभरापूर्वी भारतातून फरार झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018च्या जुलै महिन्यांत नीरव मोदीच्या नावं रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती. मात्र, नीरव मोदीला भारतात परत आणण्यात सरकारला अपयश आलं होतं.

13 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी हा सध्या लंडनमध्ये आहे. या ठिकाणी तो अगदी मुक्तपणे फिरत असल्याचा एक व्हिडिओ याआधी 'द टेलिग्राफ' या लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रानं प्रसिद्ध केला.

VIDEO : फरार नीरव मोदी सापडला, बघा काय म्हणतोय?

First published: March 19, 2019, 8:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading