S M L

दरमहा ५० कोटी देऊन परतफेड करण्याची नीरव मोदीची ताजी 'ऑफर'

प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी दरमहा ५० कोटी रुपये, याप्रमाणे परतफेड करून कायदेशीर देण्याची पै न पै चुकती करण्याची ताजी ऑफर' दिली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 19, 2018 10:12 AM IST

दरमहा ५० कोटी देऊन परतफेड करण्याची नीरव मोदीची ताजी 'ऑफर'

19 फेब्रुवारी : देशाच्या सार्वजनिक क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत तब्बल 11 हजार 360 कोटी रूपयांचा घोटाळा केलेल्या प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी दरमहा ५० कोटी रुपये, याप्रमाणे परतफेड करून कायदेशीर देण्याची पै न पै चुकती करण्याची ताजी ऑफर' दिली आहे. नीरव मोदीने पीएनबी, प्राप्तिकर विभाग आणि 'ईडी' यांना पाठविलेल्या ताज्या ई-मेलमध्ये दरमहा ५० कोटी रुपये याप्रमाणे परतफेड करण्याची 'ऑफर' देण्यात आली आहे.

दरम्यान, पीएनबी बँकेत झालेल्या घोटाळ्याबाबत पीएनबीचे एमडी सुनील मेहता यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नीरव मोदीच्या या ऑफरचा मुद्दा मांडण्यात आला होता. पण ही ऑफर पोकळ असल्याचं सांगत त्यांनी त्यावर भाष्य करण्यास टाळले. पण त्यानंतर नीरव मोदींनी ईडीला पाठवलेल्या ई-मेलमध्ये त्यानं दरमहा 50 कोटी रुपये परत करण्याची ऑफर केली आहे.

या सगळ्यात मात्र मोदी सरकारनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बँक घोटाळ्याच्या या प्रकरणात सरळ दोन्ही हात वर करून बँका आणि तपासील यंत्रणांना हे प्रकरण हाताळण्यास सांगूण सावध पवित्रा घेतला आहे. म्हणूनच कदाचित सरकारनं नीरव मोदींचा पासपोर्ट फक्त एका महिन्यासाठीच निलंबित केला आहे. पण या सगळ्यातून आता नीरव मोदीची ऑफर स्विकारायची की नाही हे आता पीएनबीच ठरवू शकते. आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2018 10:12 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close