नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला, 29 मार्चपर्यंत राहणार कोठडीत

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली.

News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2019 06:29 PM IST

नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला,  29 मार्चपर्यंत राहणार कोठडीत

लंडन, 20 मार्च:  लंडनच्या कोर्टाने घोटाळेबाज नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता त्याला 29 मार्चपर्यंत कोठडीतच राहावं लागणार आहे. पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्याला कोर्टातही हजर करण्यात आलं. त्यावर आपल्याला जामीन मिळावा अशी याचिका नीरव मोदीने केली होती. पण त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने टाकलेल्या दबावानंतर इंग्लंडने ही कारवाई केली आहे.

भारतीय बँकिंग क्षेत्रात 13 हजार कोटींचा घोटाळा केल्यानंतर नीरव मोदी वर्षभरापूर्वी भारतातून फरार झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018च्या जुलै महिन्यांत नीरव मोदीच्या नावं रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती.

दोनच दिवसांपूर्वी म्हणजे 18 मार्च रोजी नीरव मोदीच्या विरोधात अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. लंडनच्या कोर्टाने नीरव मोदीच्या विरोधात हा निर्णय घेतला आहे. 13 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी लंडनमध्ये अगदी मुक्तपणे फिरत असल्याचा एक व्हिडिओ 'द टेलिग्राफ' या लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रानं काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केला होता. तसेच नीरव मोदीला आम्ही शोधलं असून तो 'वेस्ट एन्ड लंडन'मध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचा दावा टेलिग्राफनं केला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 06:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...