भारतात आणल्यानंतर विजय माल्ल्या, नीरव मोदी एकाच जेलमध्ये राहणार?

नीरव मोदीला भारतात आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये ठेवलं जाणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 30, 2019 11:57 AM IST

भारतात आणल्यानंतर विजय माल्ल्या, नीरव मोदी एकाच जेलमध्ये राहणार?

नवी दिल्ली, 30 मार्च : फरार हीरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडनच्या जेलमध्ये आहे. नीरव मोदीला लंडनमध्ये अटक झाल्यानंतर त्याचा जामीन अर्ज देखील न्यायालयानं फेटाळून लावला. यावेळी सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी नीरव मोदीला भारतात पाठवल्यास कोणत्या जेलमध्ये ठेवलं जाईल? असा सवाल केला. त्यावर भारतानं नीरव मोदीला मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ठेवलं जाईल. नीरव मोदीची जेलमधील रूम ही विजय माल्ल्याची असणार आहे. भारताच्या उत्तरानंतर न्यायाधीशांनी देखील त्या खोलीचा व्हिडीओ आम्ही पाहिला असल्याचं नमूद करत त्या ठिकाणी आणखी एका व्यक्तीसाठी जागा असल्याचं म्हटलं. विजय माल्ल्या भारतीय बँकांचे तब्बल 9 हजार कोटी रूपये बुडवून परदेशात पसार झाला आहे. तो देखील सध्या लंडनमध्ये वास्तव्याला असून भारताकडून त्याच्या प्रत्यापर्णासाठी देखील सध्या जोरात प्रयत्न सुरू आहेत.


भारतातल्या एकमेव मतदारसंघात EVM नाही तर बॅलेट पेपरद्वारे होणार मतदान


भारतानं व्हिडीओ केला सादर

दरम्यान, विजय माल्ल्याच्या प्रत्यापर्णासाठी सध्या भारत प्रयत्न करत आहे. त्याला भारतात आणल्यानंतर कोणत्या जेलमध्ये ठेवलं जाणार? ती खोली कशी आहे? त्यामध्ये कोणत्या सुविधा आहेत? याचा व्हिडीओ भारतानं लंडनच्या कोर्टामध्ये यापूर्वीच सादर केला आहे. त्यामुळे नीरव मोदीला भारतात आणल्यानंतर  देखील विजय माल्ल्यासाठी तयार केलेल्या खोलीत ठेवलं जाणार असल्याची माहिती भारतानं लंडनच्या कोर्टात दिली.

पंजाब - नॅशनल बँकेचे तब्बल 12 हजार कोटी रूपये घेऊन नीरव मोदी परदेशात पसार झाला. त्याचा मामा मेहुल चोक्सी देखील या घोटाळ्यामध्ये सहभागी आहे. त्याला काहीही करून भारतात आणणार असं सरकारनं जाहीर केलं आहे. त्याच धर्तीवर आता भारतानं पावलं उचलली आहेत.


VIDEO: काँग्रेस प्रवेशापूर्वी पुण्याच्या उमेदवारीबाबत प्रवीण गायकवाड म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 11:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close