मराठी बातम्या /बातम्या /देश /हरिद्वार कुंभ समाप्तीची घोषणा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निरंजनी आखाड्याचा निर्णय

हरिद्वार कुंभ समाप्तीची घोषणा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निरंजनी आखाड्याचा निर्णय

हरिद्वार कुंभमध्ये (Haridwar Kumbh) दररोज आढळणारे कोरोना रुग्ण पाहाता आता कुंभ समाप्तीची चर्चा सुरू होती. याच चर्चेदरम्यान गुरुवारी निरंजनी आखाड्यानं समाप्तीची घोषणा (Niranjan Akhara Announces End to Kumbh Mela) केली आली आहे.

हरिद्वार कुंभमध्ये (Haridwar Kumbh) दररोज आढळणारे कोरोना रुग्ण पाहाता आता कुंभ समाप्तीची चर्चा सुरू होती. याच चर्चेदरम्यान गुरुवारी निरंजनी आखाड्यानं समाप्तीची घोषणा (Niranjan Akhara Announces End to Kumbh Mela) केली आली आहे.

हरिद्वार कुंभमध्ये (Haridwar Kumbh) दररोज आढळणारे कोरोना रुग्ण पाहाता आता कुंभ समाप्तीची चर्चा सुरू होती. याच चर्चेदरम्यान गुरुवारी निरंजनी आखाड्यानं समाप्तीची घोषणा (Niranjan Akhara Announces End to Kumbh Mela) केली आली आहे.

हरिद्वार 16 एप्रिल : कोरोनाचा वाढता प्रसार आणि हरिद्वार कुंभमध्ये (Haridwar Kumbh) दररोज आढळणारे कोरोना रुग्ण पाहाता आता कुंभ समाप्तीची चर्चा सुरू होती. याच चर्चेदरम्यान गुरुवारी निरंजनी आखाड्यानं समाप्तीची घोषणा (Niranjan Akhara Announces End to Kumbh Mela) केली आली आहे. आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी कुंभच्या समाप्तीची घोषणा करत सांगितलं, की कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता आखाड्यानं असा निर्णय घेतला आहे, की 17 एप्रिलला कुंभ मेळा समाप्त केला जाईल. पुरी यांनी इतर आखाड्यांनाही मेळा समाप्त करण्याचं आवाहन केलं. पुरी म्हणाले, की कोरोना स्थिती पाहाता लोकांच्या हितासाठी मेळा समाप्तीची घोषणा करणं गरजेचं आहे.

महंत पुरी यांनी न्यूज 18 सोबत बातचीत करताना म्हटलं, की साधू-संतांसह सामान्य भाविकांनाही कोरोनाची लागण होत आहे. यामुळे, कुंभ मेळा ठरलेल्या वेळेच्या आधीच समाप्त करण्याचा निर्णय आखाड्यानं घेतला आहे. त्यांनी असा दावाही केला, की इतर आखाडेदेखील त्यांच्या आखाड्याच्या या निर्णयासोबत सहमत आहेत. महंत रवींद्र पुरी यांच्या म्हणण्यानुसार, 27 एप्रिलला महाकुंभचं शाही स्नान आहे, हे या महाकुंभचं अंतिम शाही स्नान असेल. त्यामुळे, महाकुंभची परंपरा सुरुच राहिल. मात्र, यादिवशी बहुतेक संत हे सांकेतिक स्नानच करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. रविंद्र पुरी यांनी सांगितलं, की त्यांनी आखाड्याच्या छावणीमध्ये उपस्थित सर्व संतांना लवकरात लवकर आपल्या मंदिरांमध्ये आणि मठांमध्ये परत जाण्यास सांगितलं आहे, जेणेकरुन कोरोना प्रसाराचा धोका कमी होईल.

Corona संकटात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 50 हजार मेट्रिक टन वैद्यकीय Oxygen आयात

याच आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनाही 11 एप्रिलला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्याशिवाय इतर आखाड्यांचे संतही पॉझिटिव्ह आढळले आहेत.महाकुंभ मेळ्यासोबत जोडल्या गेलेल्या सीएमओ अर्जुन सिंह सेंगर यांच्या म्हणण्यानुसार, आखाड्यात जास्त जणांच्या कोरोना चाचणी केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येचा अंदाज लावणं शक्य नाही.

याआधी निर्वानी आखाड्याचे संत कपिल देव यांचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. कपिल देव यांना कोरोनाची लागण झाली होती आणि देहरादूनच्या कैलाश रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. याआधी गुरुवारीच हरिद्वार महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या १२० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मागील आठवड्यात हरिद्वार कुंभमध्ये स्नानासाठी लाखोच्या संख्येनं भाविक जमले. यादरम्यान कोरोना रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

First published:

Tags: Corona spread, Corona updates, Kumbh mela