अहमदाबाद हादरलं! बॉयलर फुटून भडकली भीषण आग, 9 जणांचा होरपळून मृत्यू

अहमदाबाद हादरलं! बॉयलर फुटून भडकली भीषण आग, 9 जणांचा होरपळून मृत्यू

आग झपाट्यानं पसरल्यामुळे गोडाऊनमध्ये अडलेल्या अनेकांना बाहेर निघता आलं नाही

  • Share this:

अहमदाबाद, 4 नोव्हेंबर: गुजरातमधील (Gujarat)अहमदाबाद शहरात (Ahmedabad) टेक्सस्टाईल कंपनीच्या बॉयलरचा स्फोट होऊन भीषण आग (Fire) लागली आहे. या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांनी तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. काहीचं प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

हेही वाचा...फिल्मी स्टाईल अपहरण.. गाडी खराब झाल्यानं बिल्डरला रस्त्यात सोडून अपहरणकर्ते फरार

अग्निशमन दलाचे अधिकारी जयेश खादिया यांनी सांगितलं की, पिराना-पिपलाज मार्गावर (Pirana-Piplaj Road) ही घटना घडली. बॉयलरचा स्फोट होताच संपूर्ण इमारतीत आग पसरली. या इमारतीत कपड्यांचं गोडाऊन होतं. स्फोटाच्या आवाजाने गोडाऊन कोसळलं. तसेच गोडाऊनमध्ये भीषण आगही अनेक कामगार काम करत होते. आतापर्यंत 12 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींना एलजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी चार जणांना मृत घोषित करण्यात आलं आहे. तर 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.

पंतप्रधानांनी व्यक्त केलं दु:ख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी 'ट्वीट'मध्ये म्हटलं आहे की, अहमदाबाद येथील गोडाऊनला लागलेल्या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांचं त्यांनी सांत्वन केलं आहे. जखमींसाठी देखील पंतप्रधानांनी प्रार्थना केली आहे आहे. प्रशासनाकडून मृतांच्या नातवाईकांनी मदत करण्यात येत आहे.

अग्निशमन दलाचे 24 बंब घटनास्थळी...

सूत्रांनी सांगितलं की, आग झपाट्यानं पसरल्यामुळे गोडाऊनमध्ये अडलेल्या अनेकांना बाहेर निघता आलं नाही. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 24 गाड्या पोहोचल्या आहेत. आग विझवण्यासाठी 50 जवान शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: November 4, 2020, 5:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या