लोकं गाड्यांसमोर हेल्मेट घालून नाचताय, KiKi चॅलेंजनंतर आले 'हे' नवे चॅलेंज!

लोकं गाड्यांसमोर हेल्मेट घालून नाचताय, KiKi चॅलेंजनंतर आले 'हे' नवे चॅलेंज!

केरळ पोलिसांनी असं चॅलेंज करू नका असं आवाहन केलं आहे.

  • Share this:

28 नोव्हेंबर : 'KiKi चॅलेंज' नंतर आता आणखी एक चॅलेंजचं वादळ घोंघावू लागलं आहे. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. या नव्या चॅलेंजचं नाव आहे 'Nillu Nillu चॅलेंज'.

केरळमध्ये 'Nillu Nillu चॅलेंज'ने धुमशान घातले आहे. या चॅलेंजमध्ये काही तरुण हे धावत्या गाडीसमोर येऊन डान्स करत आहे.

खरंतर 2004 मध्ये 'Rain Rain Come Again' नावाचा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात Nillu Nillu हे गाणं होतं. हे गाणं आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. केरळमध्ये हे गाणं इतकं लोकप्रिय झालं ही गल्लीबोळात ऐकलं जातं.

'Nillu Nillu चॅलेंज'मध्ये लोकांचा एक गट दुसऱ्या गटाला चॅलेज देतो. हे चॅलेंज असं असतं की, तुमच्या गटाला समोरुन धावत येणाऱ्या गाडीसमोर सिनेमात Nillu Nillu गाण्यावर डान्स करायचा. बरं गंमत म्हणजे, डान्स करत असताना या तरुणांकडे झाडाचे पत्ते आहे आणि डोक्यात हेल्मेट घातले आहे.

विष्णु उन्नीकृष्णन सारखा सुपर स्टार अभिनेत्यानेही हे चॅलेंज पूर्ण केलं आहे.

परंतु, या नव्या चॅलेंजमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. हे चॅलेंज किकी चॅलेंजपेक्षा जास्त खतरनाक आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केरळ पोलिसांनी असं चॅलेंज करू नका असं आवाहन केलं आहे.

===========================================

First published: November 28, 2018, 9:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading