S M L

पाटीदार नेता निखिल सवानींची भाजपला सोडचिठ्ठी

नरेंद्र पटेल या पाटीदार नेत्यांना तब्बल 1 कोटीची ऑफर भाजपने दिली आहे असा आरोपही करण्यात आला आहे . तसंच अनेक नेत्यांना पैसे देऊन भाजप विकत घेत असल्याचा आरोप सवानी यांनी केला आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 23, 2017 11:27 AM IST

पाटीदार नेता निखिल सवानींची भाजपला सोडचिठ्ठी

23 ऑक्टोबर:गुजरात निवडणुकीच्या तोंडावर निखिल सवानी हा पाटीदार नेता भाजपचा राजीनामा देत असल्याची माहिती त्यांनी दिली आहेत. आता ते परत हार्दिक पटेलांच्या गटाला मिळाले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर सवानींसारखा पटेल नेता सोडून जाणं हा भाजपला मोठा धक्का ठरू शकतो. नरेंद्र पटेल या पाटीदार नेत्यांना तब्बल 1 कोटीची  ऑफर   भाजपने दिली आहे असा आरोपही करण्यात आला आहे . तसंच अनेक नेत्यांना पैसे देऊन भाजप विकत घेत असल्याचा आरोप सवानी यांनी केला आहे.  याच कारणामुळे सवानी यांनी  भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  काही दिवसांपूर्वीच सवानी भाजपमध्ये सामील झाले होते. आता सवानी  हार्दिक पटेलच्या गोटात परतले आहेत.

या सगळ्या घडामोडी पाहता आता भाजप पटेल मतदारांना आपल्याकडे कसं वळवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2017 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close