मुंबई, 25 जुलै: शेअर बाजारात पुन्हा तेजीचे दिवस आलेत. निफ्टीने पहिल्यांदाच 10 हजाराचा विक्रमी आकडा पार केलाय. दुसरीकडे सेन्सेक्सही रेकॉर्ड लेव्हलवर ट्रेंड करत आहे.
आज सकाळी शेअर मार्केट सुरु होताच निफ्टी 44.15 अंकांनी वाढून 10,010.55 वर पोहोचला. तर सेन्सेक्स 106 अंकांनी वाढून 32,352 वर सुरू झाला. जाणकारांच्या म्हणण्यानुसार जागतिक बाजारपेठेतील चढ-उतार आणि भारतात वाढत चाललेली परकीय गुंतवणूक हे या तेजीचे मुख्य कारण आहे. या वाढीमुळे गुंतवणुकदारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
निफ्टीने हा विक्रमी आकडा पार करण्यामागे रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, अडानी पोर्ट्स, इंडियाबुल मार्केट, एचडीएफसी बँकांसारख्या कंपन्यांची मुख्य भूमिका आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे या कंपन्यांचे शेअर्स चांगलेच वधारलेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा